Solapur Loksabha : सोलापूरच्या राखीव जागेवर मराठा समाज उमेदवार देणार, प्रणिती शिंदे, राम सातपुतेंविरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता
Solapur Loksabha : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) राखीव मतदारसंघातून मराठा समाजकडून उमेदवार उभा केला जाणार आहे.
Solapur Loksabha : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) राखीव मतदारसंघातून मराठा समाजकडून उमेदवार उभा केला जाणार आहे. अनुसूचित जातीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने अनेक उमेदवार इच्छुक असून त्यांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाज तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक माऊली पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंधरा उमेदवारांनी मांडली आपली भूमिका
मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत एकूण पंधरा उमेदवारांनी मांडली आपली भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या संदर्भातील अहवाल लवकरच मनोज जरांगे यांना कळवणार असून त्यानंतर उमेदवार निश्चित केली जाणार आहे. तर विविध उमेदवारांनी देखील मराठा समाजाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
मराठा समाज राज्यभरात उमेदवारी अर्ज भरणार
सगे सोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा मराठा समाज तुमचा राजकीय सुपडा साफ करेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. शिवाय प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देऊन मराठा समाजाची राजकीय ताकद दाखवून देऊ असंही जरांगे म्हणाले होते. त्यानंतर राज्यभरातून मराठा समाज उमेदवार उभे करताना दिसत आहे. मराठा समाजाने उमेदवार उभे केल्याने अनेक मतदारसंघात मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून राम सातपुतेंना उमेदवारी
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही माळशीरसचे उमेदवार असलेल्या राम सातपुतेंना मैदानात उतरवले आहे. या शिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही या मतदारसंघातून लढू शकतो. दरम्यान, उमेदवारी जाहीर करताच सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपरे विरुद्ध स्थानिक असा वाद रंगलाय. सोलापूरची लेक म्हणून तुमचे स्वागत करते, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते उपरे आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर राम सातपुते यांनीही शिंदेंना जय श्रीराम म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरुन जरांगेंची प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी
मराठा आरक्षणाचा लढा बळकट करण्याच्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राज्यात तिसरी आघाडी केली आहे. शिवाय जरांगे यांच्यासोबत आघाडी करताच आंबेडकरांनी 8 उमेदवारांची घोषणा देखील केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या