एक्स्प्लोर

Solapur Lok Sabha Result 2024 : प्रणिती शिंदे यांचा विजय, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला आहे.  प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला. Solapur Lok Sabha constituency)

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयी गुलाल उधळला आहे.  प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला.  एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात (Solapur Lok Sabha constituency)  2 टर्मपासून भाजपनं बाजी मारली होती. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापुरात विजय मिळवला होता. सुशील कुमार शिंदे यांना पराभव झाला होता.  2024 निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत भाजपला रोखलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे.  

24व्या फेरीनंतर सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 606278 मते मिळाली. तर भाजपच्या राम सातपुते यांना 524657 इतकी मते मिळाली आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडे सध्या 81 हजार 621 मतांची मोठी आघाडी आहे. अखेरच्या एक ते दोन फेऱ्यात ही लीड तुटनं कठीण दिसतेय. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदेच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान, प्रणिती शिंदेना पाठिंबा देणाऱ्या माजी आमदार नरसाय्या आडम यांनी जल्लोष केला. लोकसभा निवडणुकीत माकप आमदार नरसय्या आडम यांनी काँग्रेसला दिला होता पाठिंबा

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरात तिरंगी लढत होती. काँग्रेस, भाजपसह वचिंतनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. 2019 मध्ये वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, पण त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. यंदा मात्र प्रकास आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नसल्याचे दिसले.  

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल (Solapur Lok Sabha Election Result 2024)

उमेदवाराचं नाव (Ram satpute vs Praniti Shinde) पक्ष (BJP vs Congress) विजयी की पराभूत? 

राम सातपुते

भाजप

पराभव

प्रणिती शिंदे

काँग्रेस

विजय

2024 सोलापूर विधानसभानिहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे   (Solapur Lok Sabha Voting Percentage 2024) 

मोहोळ 63.15, सोलापूर शहर उत्तर 59.15, सोलापूर शहर मध्य 56.51, अक्कलकोट 59.17, सोलापूर दक्षिण 58.28, पंढरपूर 59.04 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.19 टक्के झाली आहे.

सभा आणि प्रचाराचा परिणाम मतदारांवर

महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदेना उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने सुरुवातीला त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. प्रणिती शिंदे यांनी गावागावात जाऊन कॉर्नर बैठका आणि लोकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. प्रणिती शिंदेंसाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या सभा झाल्या. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उद्धव ठाकरेंच्या सभेत मुस्लिम समजाची गर्दी लक्षणीय होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर ठाकरेंची सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं. तर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी दिग्गज नेत्यांच्या सभांवर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेत्यांच्या सभा राम सातपुतेंच्या प्रचारार्थ पार पडल्या. या सर्व सभा आणि प्रचाराचा परिणाम मतदारांवर नक्कीच होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सोलापुरातील पाणी प्रश्न, उद्योग धंद्याचा प्रश्न, सोलापुरातील बेरोजगारी हे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. तर भाजपने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्याकडे देखील वळवण्याचा प्रयत्न केला. धार्मिक धुर्वीकरणाचे राजकारण देखील यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. या सर्व बाबींचा थेट परिणाम निकालावर होणार आहे.

सोलापूरमध्ये सहा पैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार

सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो. यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळ येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. सोलापूर मध्य या मतदारसंघात एकमेव काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 30 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत.

अक्कलकोट - सचिन कल्याण शेट्टी  (Sachin Kalyanshetti)
उत्तर सोलापूर - विजयकुमार देशमुख (Vijay Deshmukh)
सोलापूर मध्य   - प्रणिती शिंदे (Praniti Shinde) 
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) 
मोहोळ - यशवंत माने (Yashwant Mane)
पंढरपूर-मंगळवेढा - समाधान आवताडे  (Samadhan Autade)

2019 लोकसभेत त्रिशंकू लढत - sushil kumar shinde 2019 election result - 

2019 ची निवडणूक ही अनेक अर्थानी महत्वपूर्ण होती. सुशीलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपने विद्यमान खासदारचा पत्ता कट करून अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारनाशी कसलाच संबंध नाही अशा डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलेलं होतं. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारानी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली. सुशीलकुमार शिंदेचा सुमारे दीड लाख मतांनी डॉ. जयसिद्धेश्वर यांनी पराभव केला. 

कुणाला किती मतं मिळाली ?

डॉ. जयसिद्धेश्वर  -  5,24,985 मतं 
सुशील कुमार शिंदे 3,66,377 मतं
प्रकाश आंबेडकर -  1,70,007 मतं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Embed widget