समाजमाध्यमांचा वापर सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी करावा: आदिती तटकरे
Aditi Tatkare: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर हा अपरिहार्य असला तरी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही आणि सामाजिक सलोखा जपला जाईल याची दक्षता घ्यावी, असे राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
Aditi Tatkare: सध्या सोशल मीडियाचा अनेक नेटकऱ्यांकडून गैर वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मजकूर देखील पोस्ट केले जात आहेत. अशातच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर हा अपरिहार्य असला तरी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही आणि सामाजिक सलोखा जपला जाईल याची दक्षता घ्यावी, असे राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या आहेत.
'डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी'तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये 'राजकारणातला सोशल मीडिया' या विषयावर त्या बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार, देवेंद्र भुयार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना तटकरे म्हणाल्या की, समाजमाध्यमांचा वापर व्यक्तिमत्वाला साजेसा असावा. समाज माध्यमाद्वारे वेगाने संदेश पोहोचत असले तरी प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, रोहित पवार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम यांनी ते कशा प्रकारे समाज माध्यमांचा वापर करतात तसेच समाज माध्यमांचा वापर करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निशाणा
- ज्या मैदानावर बाळासाहेबांचा अजानला विरोध, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे सभा गाजवणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू