भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतच श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Ashok Chavan on Sreejaya Chavan : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतच लेकीला तिकीट मिळल्यानंतर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ashok Chavan on Sreejaya Chavan, नांदेड : भारतीय जनता पक्षाने आज (दि.20) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला पहिल्याच यादीतच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण भोकरमधून लढताना दिसणार आहेत. दरम्यान, लेकीला पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले, श्रीजया चव्हाण यांना उमेदवार दिली या बद्दल पक्ष नेते आणि पक्षाचे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. सामाजिक राजकीय क्षेत्रात श्रीजया चव्हाण चांगली सुरुवात करेन. मला या मतदारसंघाने चांगली साथ दिली. मला खात्री आहे चांगल्या मताने श्रीजया चव्हाण निवडून येईल. पक्ष आणि पक्ष नेत्याचे आभार मानतो. श्रीजया हिची पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे. चव्हाण घराण्याचे नाव आणि जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. ही मोठी जबाबदारी आहे . ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. ती जबाबदारी पुढे घेऊन मी जाईल मला विश्वास आहे.
नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी अनेकांनी उमेदवारी मागितली
नांदेड लोकसभा पोट निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, पक्ष नेत्यांनी आमची मत जाणून घेतली. लवकरात निर्णय होईल. लोकसभेत दुर्दैवाने आमच्या विरोधात निकाल लागला होता. प्रताप पाटील चिखलीकर इच्छुक आहेत असं मला वाटत नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली. अनेकांची नावे आहेत लवकर निर्णय होईल.
मनोज जरांगेंबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, जरांगे यांनी दोन-चार पद्धतीने आपली मांडणी केली. कोणाला निवडून द्यायचं कोणाला द्यायचं नाही याबाबत ते बोलले. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असावा असं माझं मत आहे.
मराठवाड्यातील भाजप उमेदवार....
फुलंब्री विधानसभा
हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी
औरंगाबाद पूर्व विधानसभा
अतुल सावे
गंगापूर विधानसभा
प्रशांत बंब
किनवट विधानसभा
भीमराव केराम
नायगाव विधानसभा
राजेश पवार
मुखेड विधानसभा
तुषार राठोड
हिंगोली विधानसभा
तानाजी मुटकुळे
जिंतूर विधानसभा
मेघना बोर्डीकर
परतूर विधानसभा
बबन लोणीकर
बदनापूर विधानसभा
नारायण कुचे
भोकरदन विधानसभा
संतोष दानवे
केज विधानसभा
नमिता मुंदडा
निलंगा विधानसभा
संभाजी पाटील निलंगेकर
औसा विधानसभा
अभिमन्यू पवार
तुळजापूर विधानसभा
राणा जगजितसिंह पाटील
भोकर विधानसभा
श्रीजया चव्हाण
इतर महत्त्वाच्या बातम्या