एक्स्प्लोर

आधी नोटा दाखवल्या मग बाटली दाखवत अंबादास दानवेंची प्रश्नांची सरबत्ती, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर

Shivsena UBT vs Shivsena MNS : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) लोकसभेच्या रिंगणात आहेत.प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक क्रांती चौकात आमने सामने आल्यानं तणावं वातावरण पाहायला मिळालं. अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दोनशे रुपये देऊ केले होते.याठिकाणी दोन्ही बाजूनं घोषणाबाजी करण्यात आली होती.

क्रांती चौकात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हातात दारुची बाटली धरुन विरोधकांवर हल्लाबोल केला. महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेंकांवर धावून जाताना पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांनी हातात नोटा धरुन मनसेला डिवचलं. यावर मनसेकडून देखील उत्तर देण्यात आलं. 

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पन्नास खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या. अंबादास दानवे यांनी भुमरे यांचा व्यवसाय दारुचा आहे त्यामुळं दारुची बाटली दाखवतोय, असं म्हटलं. पैठणची दारु संभाजीनगरमध्ये आणायची का असा सवाल दानवे यांनी केला. तणाव योग्य नाही पण आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला तर आम्ही देखील उत्तर देऊ असं अंबादास दानवे म्हणाले. संदिपान भुमरे यांचा व्यवसाय दारु असल्याचं लोकांना सांगतोय, असं अंबादास दानवे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थांबवू ,असं अंबादास दानवे म्हणाले.  तर, ठाकरे गटाकडे कार्यकर्ते नसल्यानं असा प्रकार करण्यात आला, असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

पाहा व्हिडीओ

पोलिसांचा बंदोबस्त कमी प्रमाणात?

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आमने सामने आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथं पोलीस बंदोबस्त कमी प्रमाणात दिसून आला. 
 
पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्याचं आवाहन केलं. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते क्रांती चौकात होते. तर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांना क्रांती चौकातून पुढं जाण्यास सांगितलं. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये  तिरंगी लढत

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेनेकडून संदिपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील लोकसभेच्या रिंगणात आहेत. 

संबंधित बातम्या :

Shivsena UBT MNS Clash Video : मोठी बातमी : मनसे आणि दोनशे, उठ दुपारी, घे सुपारी, संभाजीनगरमध्ये मनसे-ठाकरे गटाचा राडा!

Suresh Jain : ना शिंदेंची शिवसेना, ना भाजप, ठाकरेंची साथ सोडलेल्या सुरेश जैन यांचा मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget