Shivsena UBT MNS Clash Video : मोठी बातमी : मनसे आणि दोनशे, उठ दुपारी, घे सुपारी, संभाजीनगरमध्ये मनसे-ठाकरे गटाचा राडा!
Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने सामने आली.
छ. संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगरात मनसे आणि उद्धव ठाकरे गट समोरासमोर आले आहेत. मनसे आणि दोनशे अशी घोषणाबाजी ठाकरे गटाकडून दिल्या जात आहेत. मनसे- ठाकरे गट समोरासमोर येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. क्रांती चौकामध्ये दोनही सेना आमने सामने आल्या.
उठ दुपारी घे सुपारी, मनसे आणि दोनशे अशा घोषणा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते. दुसरीकडे मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला 20 रुपये देऊ केले. हा सर्व राडा भर दुपारी संभाजीनगरच्या क्रांती चौकात सुरु होता.
अंबादास दानवे काय म्हणाले?
मनसे म्हणतात घ्या दोनशे, पैसे घेऊन प्रचार चालू आहे म्हणून पैसे देतोय, असं अंबादास दानवे म्हणाले. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनी राज ठाकरेंचे निष्ठावंत असून 4 जूनला तुम्हाला निकालात समजेल, असं मनसेसैनिकानं म्हटलं.
पाहा व्हिडीओ:
नेमका वाद काय?
छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यात लोकसभेची लढत होत आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. नुकतंच राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. त्यानंतर आज संभाजीनगरच्या क्रांती चौकात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमने सामने आले. यावेळी मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
मनसेचा उमेदवार नसताना ते महायुतीचा प्रचार करत असल्याने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. त्याचाच पुढचा भाग संभाजीनगरात पाहायला मिळाला. मनसैनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप मविआकडून होत आहे. त्यामुळेच मनसे आणि दोनशे अशी टीका आणि घोषणा ठाकरे गटाकडून केली. इतकंच नाही तर उठ दुपारी आणि घे सुपारी अशा घोषणाही देण्यात आल्या. त्याला उत्तर म्हणून मनसेकडून 20 रुपये वाटण्यात आले. क्रांती चौकात दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा सर्व राडा पाहायला मिळाला.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी संभाजीनगरसह दहा मतदारसंघात मतदान होणार आहे. संभाजीनगरची ही हायव्होल्टेज लढत होत आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून घोषणाबाजी बराच वेळ सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. पोलिसांकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :