ठाकरे गट आणि मनसेचे शिवाजी पार्कसाठी एकाच दिवशी अर्ज, एकाच तारखेला मैदानाची मागणी, इनवर्ड नंबर BMC चे काम सोपं करणार?
Maharashtra Politics : ठाकरे गट आणि मनसेकडून शिवाजी पार्क मैदानासाठी एकाच दिवशी अर्ज दाखल करत एकाच तारखेला मैदानाची मागणी करण्यात आली आहे.
![ठाकरे गट आणि मनसेचे शिवाजी पार्कसाठी एकाच दिवशी अर्ज, एकाच तारखेला मैदानाची मागणी, इनवर्ड नंबर BMC चे काम सोपं करणार? Shivaji Park ground Uddhav Thackeray and Raj Thackeray application for Shiv Sena MNS Sabha Lok Sabha elections Maharashtra Politics marathi news ठाकरे गट आणि मनसेचे शिवाजी पार्कसाठी एकाच दिवशी अर्ज, एकाच तारखेला मैदानाची मागणी, इनवर्ड नंबर BMC चे काम सोपं करणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/95949000943dec50c02d2212c724ab641711954461513322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच आता ठाकरे गट आणि मनसेने शिवाजी पार्कामध्ये (Shivaji Park) सभा घेण्याचं ठरवलं आहे. पण, शिवाजी पार्कातील सभेसाठी निवडणुकांच्या सभेसाठी ठाकरे गट विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणते ठाकरे गट आणि मनसेकडून एकाच तारखेला सभा घेण्यासाठीचे अर्ज करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजो दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी अर्ज केला आहे. त्यामुळे आता प्रशासन कुणाला परवानगी देणार, यावर शिवाजी पार्कात कुणाचा आवाज घुमणार, हे ठरणार आहे.
शिवाजी पार्क मैदानावर आवाज कुणाचा?
17 मेला प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 17 मेला आपल्या पक्षाच्या प्रचार सभेसाठी मैदान मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी 18 मार्च रोजी एकाच दिवशी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र 17 मेला शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं मुंबई महापालिकेने दिलेल्या इनवर्ड नंबर वरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.
इनवर्ड नंबर BMC चं काम सोपं करणार?
2016 च्या शासन निर्णयानुसार, विशिष्ट 39 दिवस वगळता इतर दिवशी शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी देण्याचा अधिकार हा नगर विकास विभागाला आहे. त्यामुळे नगर विकास विभाग आता या दोन अर्जांवर नेमका काय निर्णय घेतो आणि 17 मे रोजी कोणाला सभा शिवाजी पार्क मैदानावर करायला परवानगी मिळते, हे पहावे लागेल. याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी अशाच प्रकारे एका दिवशी सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने अर्ज केला होता. मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिले अर्ज केला असल्यामुळे त्यांना सभेसाठी मैदान देण्यात आले होते.
आम्ही पहिला अर्ज केलाय, आम्हाला परवानगी मिळेल
यशवंत किल्लेदारांनी सांगितलं की, आम्ही अर्ज केला आहे. उद्धव ठाकरे गटाने सुद्धा 17 मे साठी अर्ज केलाय. 2009 मध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती होती, निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी मनसेकडून आणि शिवसेनेकडून सुद्धा अर्ज करण्यात आला होता, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधी अर्ज केला होता, त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळाली होती. त्यावेळेस 39 दिवसाचा बार नव्हता, आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 39 दिवसाचा बार आहे. 39 दिवस बघता परवानगी द्यायचे असेल तर, ते नगर विकास खात्याकडे जाते. यावेळेस आम्ही पहिला अर्ज केलाय, त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. त्या संदर्भातील कागदपत्र आम्हाला पालिकेकडून मिळाली आहेत. कागदपत्रांवर आमचा इनवर्ड नंबर आहे, त्यामुळे यूडीला जरी हे कागदपत्र पाठवले, तरी एवढी नियमानुसार निर्णय घेईल आणि आम्हाला परवानगी मिळेल.
मनसे महायुतीत सहभागी होणार?
यशवंत किल्लेदार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं, पहिली आमची सभा झाली होती रेकोर्ड ब्रेक, तो आमचा रेकॉर्ड यंदा आम्हीच मोडणार आहे. साधारण लाख सव्वा लाख लोक सभेला असतील. राज्यभरात ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत, याचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे घेतील. एकंदर सर्व घडामोडी यामध्ये युतीत सहभागी होणं, निवडणूक लढवणं, या सर्वावर राज ठाकरे 9 मार्चला बोलतील. पाठींबा असेल तर नक्कीच बोलणार, त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट असते, त्यांच्या भूमिकेनुसार पाठिंबा राहील. मनसेने सोमवारी शिवाजी पार्कची पाहणी केली, स्टेजपासून ते वाहन व्यवस्था या सगळ्या संदर्भात चर्चा झाली, यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)