एक्स्प्लोर

Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड होताना ठाकरे गटाची कृती सर्वांच्या नजरेत भरली, 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही

Shiv Sena UBT : राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही.

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी (Maharashtra Vidhan Sabha Speaker) पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचा (Shivsena UBT) एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रस्ताव मांडला. अनिल पाटील (Anil Patil) यांनी अनुमोदन दिले. यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

ठाकरेंचे सर्व आमदार गैरहजर

राहुल नार्वेकरांची निवड होत असताना ठाकरे गटाचे आमदार गैरहजर असल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षाचा निकाल देताना ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना पात्र ठरवले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष अधिकृत शिवसेना असल्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला होता. हा निर्णय घेताना राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा आधार घेतला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांच्यावर आरोप केले होते. राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय घेतल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाने घेतला होता. आता राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे सर्व आमदार गैरहजर असल्याचे दिसून आले. 20 पैकी एकही जण सभागृहात उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने केलेल्या कृतीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलताना म्हणाले की, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली याबाबत मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो. काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं त्यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणूक संपताच राज ठाकरेंना पहिला धक्का; उद्धव ठाकरे म्हणाले, एक काहीतरी...

Maharashtra Goverment: देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार?, राज्याचं लक्ष; भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री सकारात्मक!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget