एक्स्प्लोर

Maharashtra Goverment: देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मागणी मान्य करणार?, राज्याचं लक्ष; भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री सकारात्मक!

Opposition Leader Maharashtra: महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे.

Opposition Leader Maharashtra मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळं महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे. याच विषयावरुन काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी  विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीनं अर्ज भरला नाही. पण त्याबदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांनी प्रस्ताव ठेवला, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का?, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस सकारात्मक-

1999 पासून ची परंपरा होती. सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपदस्थ तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद...भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं  अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीसांसमोर केली. आमच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) देखील सकारात्मकता दिसली, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.  

देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीचा सन्मान करावा- भास्कर जाधव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा सन्मान करावा दिल्लीच्या 70 सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे 67 आणि भाजपचे केवळ 3 आमदार निवडून आले होते. तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता. तसाच सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात करतील, असे वाटते. आमच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते निवडीसाठी 10 टक्के आमदार संख्येची तरतूद नाही. त्यामुळेच आम्ही यासंदर्भात माहिती मागवली आहे, असंही भास्कर जाधव यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम काय?

विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या 10 टक्के आमदार असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 288 आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. विरोधी बाकावरच्या महाविकास आघाडीतील पक्षांपैकी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 15, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्या

Bhaskar Jadhav News : विरोधी पक्षनेते पदावार ठाकरे गट आग्रही,मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?, VIDEO: 

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी 8 वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला; कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला पोहचले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
Embed widget