एक्स्प्लोर

अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, सुषमा अंधारे म्हणाल्या...

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने (Court) दोषी ठरवले आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले की, या संपूर्ण केसचा अभ्यास केल्याशिवाय किंवा न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेतल्याशिवाय यावर भाष्य करणे उचित होणार नाही. यात शिवडी न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवलेले जरी असतील तरी अजून पुढील पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही मुद्दे आपल्याकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचे राहिले असतील, युक्तीवादात काही गोष्टी राहिल्या असतील, ज्यामुळे हे काही घडलं असेल त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात त्रुटींची पूर्तता करत नव्याने हे प्रकरण मांडण्यात येईल आणि पुन्हा दाद मागण्याचा प्रयत्न केला जाईल.

वरच्या कोर्टात दाद मागणार : सुषमा अंधारे

त्यामुळे मला वाटत नाही की, यावर फार काही चिंता करण्याचं कारण आहे. विषय गांभीर्याने नक्की हाताला जाईल. परंतु लगेचच संजय राऊत हे दोषी आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. कालच्याच रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणात निवडणूक आयोगाने रडीचा डाव खेळत त्यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. काल कार्यालयाने दणका देत ते योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खाली काही जर आमच्याकडून राहिले असतील तर आम्ही वरच्या कोर्टात त्रुटींची पूर्तता करून नव्याने दाद मागू, असे त्यांनी सांगितले. 

नेमकं प्रकरण काय? 

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आणखी वाचा

बदलापूरच्या शाळेत चाईल्ड पॉर्नोग्राफी करणारा व्यक्ती भाजप, संघाशी संबंधित; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
Embed widget