एक्स्प्लोर

बदलापूरच्या शाळेत चाईल्ड पॉर्नोग्राफी करणारा व्यक्ती भाजप, संघाशी संबंधित; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या शाळेच्या विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय.

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला होता. यानंतर देवाचा न्याय हा हॅशटॅग देशभरात चर्चेत आला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर 'बदला पुरा' असं लिहण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. तर बदलापूरच्या शाळेच्या विश्वस्तांविरोधात  मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

संजय राऊत म्हणाले की, हे स्वतःला सिंघम समजत आहेत. आता महाराष्ट्रात मी सिंघम की तू सिंघम ही चढाओढ सुरू आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात बंदूक दाखवली आहे, जणू यांना परमवीर चक्र देणार आहेत. मोठे शौर्य दाखवले आहे. या महाराष्ट्रात अनेक बलात्कार झाले. ठाणे जिल्ह्यात, नागपूरमध्ये बलात्कार झालेत, किती जणांचे एन्काऊंटर तुम्ही करणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

'त्या' व्यक्ती भाजप आणि संघाशी संबंधित

तर माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी बदलापूर शाळेच्या विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  याबाबत संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला कोणाला तरी वाचवायचे आहे. यातले दोन-तीन लोक आहेत, त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही बळी घेतला आहे. पुरावा नष्ट केला आहे. एक याचिका दाखल झाली आहे.  त्यात या शाळेत पोर्नफिल्म करण्याचा खेळ सुरू होता. त्या व्यक्ती भाजप आणि संघाशी संबंधित होत्या. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

नालासोपारातील घटनेत फडणवीस काय करणार, गोळ्या घालणार का? 

नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय तरुणीवर गुंगीचे द्रव्य पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कालच नालासोपारामध्ये भाजप पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कारामध्ये अटक झाली. फडणवीस तुम्ही यासाठी काय करणार, घालणार का गोळ्या ? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. 

आणखी वाचा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा केवळ मतांसाठी जुगाड, भाजप आमदाराची मुक्ताफळं, रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget