एक्स्प्लोर

अजित पवार, एकनाथ शिंदे फुटीर आयतोबा, बेईमानी करुन पक्ष दिला; भ्रष्ट्राचार करुन आमच्याकडे या, पक्ष देतो, हीच 'मोदी गॅरंटी' - सामना

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे 'नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी' अशी टीका मोदी-शहांनी केली होती. तीच तथाकथित 'करप्ट' पार्टी मोदी-शहांच्या गॅरंटीने आता अजित पवारांना सोपवली. दुसरे जगातले मोठे आश्चर्य असे की, अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा बॉम्ब स्वतः पंतप्रधान मोदी यांनी फोडला होता.

NCP crisis : निवडणूक आयोगाच्या (Election commission of india) कागदी निर्णयाने शरद पवार (sharad pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावर फरक पडणार नाही. निवडणूक आयोगाच्या निकालामागे (Election commission of india) अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. निवडणूक आयोग हा 'भारता'चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा (PM Modi) झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य किंवा खंत वाटण्याचे कारण नाही. याच पद्धतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना 'आयतोबा' एकनाथ शिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपच्या गोटात या, आम्ही तुमचा 'पक्ष' तुमच्या ताब्यात देतो, हीच 'मोदी गॅरंटी' आहे व लोकशाहीसाठी तो सगळय़ात मोठा धोका आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना बहाल करण्यात आला. यावरुन शिवसेना मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मोदी-शाह यांच्यावर टीका केली. तर अजित पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय. 

अग्रलेखात नेमकं काय म्हटलेय ? 

निवडणूक आयोगाच्या निकालामागे 'अदृश्य शक्ती' आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल. शिवसेना असे अनेक घाव झेलून उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांनी झंझावात निर्माण केला आहे. शरद पवारही अनेक वादळे व संकटे झेलून उभेच आहेत. निवडणूक आयोग महाराष्ट्राचा हा उत्साह कसा संपवणार? मोदी-शहांची अप्रामाणिक गॅरंटी आणि निवडणूक आयोगाची घटनाबाह्य़ झुंडशाही यांचा पराभव महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही! शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भारताचा निवडणूक आयोग सत्यास धरून प्रामाणिक निर्णय घेईल याची शक्यताच नव्हती. कारण निवडणूक आयोग हा 'भारता'चा राहिलेला नसून तो मोदी-शहांचा झाला आहे. अशा संविधानिक संस्थांच्या गळ्यात हुकूमशहांचे पट्टे बांधले असतील तर त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? म्हणूनच शरद पवार यांनी प्रचंड मेहनतीने उभा केलेला राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने त्यांच्याच पक्षातील फुटीर आयतोबा अजित पवार यांच्या हवाली केला याचे आश्चर्य किंवा खंत वाटण्याचे कारण नाही. याच पद्धतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना 'आयतोबा' एकनाथ मिंधे यांच्या हाती सोपवली गेली. म्हणजे तुम्ही बेइमानी करून, भ्रष्टाचार करून भाजपच्या गोटात या, आम्ही तुमचा 'पक्ष' तुमच्या ताब्यात देतो, हीच 'मोदी गॅरंटी' आहे व लोकशाहीसाठी तो सगळय़ात मोठा धोका आहे.

तथाकथित 'करप्ट' पार्टी मोदी-शहांच्या गॅरंटीने आता अजित पवारांना सोपवली

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे 'नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी' अशी टीका मोदी-शहांनी केली होती. तीच तथाकथित 'करप्ट' पार्टी मोदी-शहांच्या गॅरंटीने आता अजित पवारांना सोपवली. दुसरे जगातले मोठे आश्चर्य असे की, अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा बॉम्ब स्वतः पंतप्रधान मोदी यांनी फोडला होता. त्याच अजित पवारांना 'राष्ट्रवादी' व घड्याळ चिन्ह मिळताच मोदी-शहा-फडणवीस-बावनकुळे वगैरे भाजप कुळांनी अजित पवारांचे अभिनंदन करून एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यापेक्षा ढोंग आणि वैचारिक व्यभिचार तो कोणता? 'शिवसेना', 'राष्ट्रवादी काँग्रेस'सारख्या महाराष्ट्र अस्मिता जपणाऱया मराठी माणसांचे पक्ष पह्डून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पुरती वाट लावण्याची गॅरंटी मोदी-शहांच्या राजकारणाने दिली आहे हे नक्की झाले. 

टाळकुटय़ांमुळेच देशात कधी मोगलांचे तर कधी ब्रिटिशांचे राज्य आले

विधिमंडळातील बळ म्हणजे नाही, विधिमंडळातील पक्ष वेगळा व पक्ष संघटन वेगळे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण 'शिवसेना' प्रकरणात असतानाही निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता लोकशाही व संविधानाची संपूर्ण हत्या करण्यासाठी हे सर्व प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले जाईल. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक महाराष्ट्रीय जनतेला मूर्ख समजले काय? जेथे 'ठाकरे' तेथेच शिवसेना व जेथे 'शरद पवार' तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, हाच महाराष्ट्रीय जनतेचा मानस आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 42 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार आता अमित शहा यांनी केला आहे. देशभरात ते 400 पार करणार आहेत. यावर राष्ट्रीय जनता दलाच्या मनोज झा यांनी उत्तर दिले आहे, ''तुम्ही नेमका आकडा सांगताय याचा अर्थ त्या पद्धतीने 'ईव्हीएम' सेट झाल्या आहेत.'' देशातल्या लोकशाहीचे हे दशावतार आहेत. निवडणूक आयोग, संसद, न्यायालये, ईव्हीएम असे सगळे काही एक-दोन व्यक्तींच्याच मुठीत असल्यावर ही मंडळी महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागाच काय, 148 जागा व देशात 700 जागा सहज जिंकू शकतात! श्रीमान मोदी हे संसदेत व बाहेर तर्कहीन भाषणे करतात व त्यांचे अंधभक्त टाळ्या वाजवतात. या टाळकुटय़ांमुळेच देशात कधी मोगलांचे तर कधी ब्रिटिशांचे राज्य आले होते, पण त्याही काळात छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सावरकर निर्माण झालेच होते व देशावर अन्याय करणाऱ्यांचे धिंडवडे निघाले होते. राष्ट्रवाद हा भाजपचा अजेंडा नसून फक्त निवडणूक आणि सत्ता हाच त्यांचा आत्मा बनला आहे. 

आणखी वाचा :

पाकीटमारासारखं चोरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार अलीबाबा 40 चोर पार्टी नावं देणार - जितेंद्र आव्हाड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 03 PM : ABP MajhaSanjana Jadhav Accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघातPune : धक्कादायक! पुण्यात उच्चशिक्षीत महिलेला 3.5 कोटी रुपयांना गंडाABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 30 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
कविता राऊतपाठोपाठ रोईंगपटू दत्तू भोकनळची सरकारविरोधात न्यायालयात धाव, नेमकं काय आहे कारण?
Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मानधनाबाबत मोठा निर्णय
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
खड्डा चुकवताना बीडमध्ये बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Tirupati Laddu controversy : कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
कमीत कमी देवाला तरी राजकारणापासून लांब ठेवा! तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादावर कोर्टाची सर्वोच्च 'चपराक'!
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
आरक्षण संपवण्याच्या हालचाली, पडद्यामागे भाजप-ठाकरे गटाच्या गुप्त वाटाघाटी; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दरवाजे उघडले, युवकांना प्रशिक्षण देणार, 15 हजार मानधन रुपये मिळणार
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी, दरमहा 15 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटण, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
गूडन्यूज! मुंबईत दाबलं बटण, गावाकडं आले पैसे; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10 हजार अनुदान जमा
Embed widget