(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये बंडाळी होऊ देणार नाही, डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात
Sanjay Raut: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या ठाकरे गोटात चाललेली अंतर्गत खळबळ, शिंदे गटात जाणाऱ्यांची चर्चा यामुळे ठाकरे गट अस्वस्थ आहे.
Sanjay Raut: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या ठाकरे गोटात चाललेली अंतर्गत खळबळ, शिंदे गटात जाणाऱ्यांची चर्चा यामुळे ठाकरे गट अस्वस्थ आहे. अशातच नाशिक शिवसेनेला उभारी देण्यासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) शहराच्या पदाधिकऱ्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या ठाकरे गटाला उर्जितावस्था मिळणार यात शंका नाही. मात्र शिंदे गटात जाणाऱ्यांची मनधरणी संजय राऊत करणार असल्याचे समजते. त्यामुळे उद्या ते स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चेसह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटातील काही नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देताना शिवसेना गोटात अस्वस्थता निर्माण करण्यात येत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत सोक्ष मोक्ष लावण्यासाठी संजय राऊत स्वतः याबाबत चर्चा करणार आहेत. त्यासाठी एका दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. उद्या गुरुवारी सायंकाळी 1 डिसेंबर रोजी ते नाशिकमध्ये दाखल होणार असून 2 डिसेंबर शुक्रवारी दिवसभर पदाधिकाऱ्यांशी तसेच माजी नगरसेवकांची वन टू वन चर्चा करून त्यांच्या नेमकी अडचणी जाणून घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते मेळावा घेऊन शिंदे गटाचा चांगला समाचार घेणार आहेत.
मेळाव्यातून शिंदे गटाचा समाचार
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमधील उत्सुकता वाढली आहे. अलीकडील नाशिकच्या राजकारणात चाललेली धुसफूस, भाजपची संथ चाल, शिंदे गटाची अंतर्गत धुसफूस, ठाकरे गट एकला चलो रे ची भूमिका बजावत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका आणि शिंदे गटाच्या पार्श्वभूमीवर राऊत चांगला समाचार घेण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा
काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन मेळाव्यांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता मात्र परिस्थिती नाजूक स्थितीत असल्याने मेळाव्यासह राऊत हे पदाधिकारी व नगरसेवकांशी वन टू वन चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र अद्याप दौरा अंतिम झालेला नाही.
इतर महत्वाची बातमी: