एक्स्प्लोर

Amol Kolhe : लंकेंना आणलं, आता पवारांकडून आणखी एक टास्क? अमोल कोल्हे 'इन्कमिंग'वर स्पष्टच बोलले!

अमोल कोल्हे यांनी आज कात्रत भागात महागाईची होळी पेटवून विरोधकांना लक्ष्य केलं. आगामी काळात राष्ट्रवादीत अनेकांचा प्रेवश होईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आपल्या सोईनुसार पक्षबदल करतायत. याविशाय तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेऊनही अनेक नेते आपली भूमिका बदलताना दिसतायत. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रावादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचाही समावेश आहे. ते लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास त्यांना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. लंके यांना शरद पवार यांच्या गटात आणण्यासाठी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. याच अमोल कोल्हे यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी नेते येतील असे संकेत दिले आहेत. 

अमोल कोल्हेंनी पेटवली महागाईची होळी

अमोल कोले आज (24 मार्च) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कात्रज भागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होळीचे दहन केले. यावेळी त्यांनी महागाईची होळी पेटवत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. होळी पेटवल्यानंतर होळी रे होळी पुरणाची पोळी, गद्दारांना देऊ निष्ठेची गोळी, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. 

...तरी 400 पार होणार नाहीत

शरद पवार यांच्याविषयी बोलल्यावरच प्रत्येकजण चर्चेत येतो. त्यामुळेच  शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. शरद पवार यांनी गेली 55 वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका केली म्हणजे, या कामात बदल होईल असं नाही. महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. देशपातळीवरही असेच चित्र आहे. भाजपकडून 400 पारचा नारा लावला जात आहे. शिवसेना फोडून 400 पार होत नाही हे भाजपला समजलं, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तरीदेखील 400 पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाहीत हे समजलं. त्यानंतर आता ते मनसेला सोबत घेत आहेत. तरीदेखील 400 चा आकडा पार करता येत नाही हे दिसत असल्यामुळे आता त्यांना रासपची गरज भासत आहे, असं कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हेंवर आणखी एक जबाबदारी? कोणाचा प्रेवश होणार?

शरद पवार यांच्या पक्षाकडून वेगवेगळ्या जागांसाठी सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी अनेक नेत्यांचा आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकतो. निलेश लंके यांच्या प्रवेशासाठी अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले. कोल्हेंची ही शिष्टाई सफल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवल्याचं बोललं जातंय. ही जबाबदारी कोणती आहे, भविष्यात कोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतही अमोल कोल्हे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर बोलताना कोल्हे म्हणाले की, इन्कमिंग तर जोरदार आहे. ते येणाऱ्या काळात नक्की बघायला मिळेल. मी आता फक्त एवढंच सांगेन की वेट अँड वाच करावं. लवकरच सगळं स्पष्ट होईल. त्यांच्या या सूचक विधानानंतर आता शरद पवार यांच्या गटात आणखी कोण-कोण येणार, असा प्रश्न विचारला जातोय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget