(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sheetal Mhatre Video: शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओमागचा खरा सूत्रधार वरुण सरदेसाई; शिवसेना शिंदे गटाचा आरोप
शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे, असा सवाल युवासेनेचे नेते (ठाकरे गट) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला होता. यालाच आता शिवसेनाने (शिंदे गट) प्रत्युत्तर दिलं आहे.
Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केलेला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे, असा सवाल युवासेनेचे नेते (ठाकरे गट) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला होता. यालाच आता शिवसेनाने (शिंदे गट) प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना प्रवक्ते (शिंदे गट) राहुल लोंढे म्हणाले आहेत की, ''खरा व्हिडिओ समोर आणा असं म्हणताय लाज वाटायला हवी. खरा सूत्रधार वरून सरदेसाई असा आमचा ठाम आरोप आहे.''
राहुल लोंढे म्हणाले की, ''बाळासाहेबांची कधीही महिलांचा अपमान करा. महिलेचे चारित्र्यहनन करा ही बाळासाहेबांची शिकवण नाही. या व्हिडीओ संदर्भात जे आदेश देण्यात आले ते आदेश मातोश्री देण्यात आले. शितल म्हात्रे आणि त्यांची मुलं व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रडताय आणि हे म्हणतायत की खरा व्हिडीओ समोर आणा. आम्ही आतापर्यंत शांत आहोत. जर असेच वक्तव्य त्यांच्याकडून होत असतील तर महाराष्ट्रातील युवासेना ही श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही.''
Sheetal Mhatre Viral Video : काय म्हणाले वरुण सरदेसाई?
शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओवर बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले होते की, ''प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी तो संपूर्ण व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असून या प्रकरणी राज सुर्वेंना अटक व्हायला पाहिजे.'' ते म्हणाले होते की, ''जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. त्यांच्यावर रोज आरोप होत आहेत, कारवाया केल्या जात आहेत. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत. मात्र ते नेते भाजपमध्ये गेले, त्यांच्यावरील कारवाया थांबतात. जनता हे सगळं पाहत आहे. जनतेला हे रुचलेलं नाही आणि त्यामुळेच ठिकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत आहे.''
दरम्यान, गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.