बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला त्यांची.... शर्मिला ठाकरेंचा मोठा पॉज, राज ठाकरेंच्या भाषणानंतर हल्लाबोल
Mahayuti Sabha at Shivaji Park : मतदारांना आवाहन करताना शर्मिला ठाकरेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, असं त्यांनी मतदारांना सांगत बाळासाहेबांच्या 'त्या' वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.
Sharmila Thackeray on Thackeray Group : मुंबई : शिवाजी पार्कात (Shivaji Park) पार पडलेल्या महायुतीच्या (Mahayuti Sabha) सभेच्या मंचावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर पाहायला मिळाले. या सभेत राज ठाकरेंनी धडाकेबाज भाषण केलं. महायुतीच्या मंचावरुन राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सभेनंतर राज ठाकरे यांच्या पत्नी आणि शर्मिला ठाकरे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी सर्व मतदारांना बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, असं आवाहन केलं आहे. तसेच, येत्या काळात महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "मला वाटतं की, राज ठाकरेंनी खात्री बाळगली आहे की, मोदीच पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या मागण्या मोदींसमोर मांडल्या आहेत. मी सर्व मतदारांना एकच विनंती करीन की, बाळासाहेबांनी एकच इच्छा व्यक्त केली होती की, मला जर काँग्रेससोबत जायला लागलं तर, मी माझा पक्ष बंद करीन, त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की, बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.... बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा... यातच आलं मला काय म्हणायचंय ते."
मला असं वाटतं लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं. सभेतील भाषणात राज ठाकरेंनी कोणत्याही गोष्टींवर टीका न करता, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत, समाजाच्या गरजा आहेत, त्यासंदर्भात मागण्या मांडल्या आहेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
महायुतीच्या मंचावरुन राज ठाकरेंचं बेधडक भाषण
शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Sharmila Thackeray : बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, राज ठाकरेंच्या भाषणावर पत्नीची प्रतिक्रिया