(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Sharad Pawar : सांगलीत बोलत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा रेजिमेंटबाबत भाष्य केलं आहे.
Sharad Pawar, सांगली : "पडेल ती किंमत देणारा मराठा समाज आहे. देशाच्या सैन्यात प्रत्येक समाजाचे रेजिमेंट आहेत. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगाव येथे आहे. मराठा रेजिमेंटचे नाव आबदीने घेतले जाते. हिमालय सारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही, जमीन नाही, पाकिस्तान सीमेवर अशा कठीण ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करत आहे", अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा रेजिमेंटबाबत भाष्य केलं. सांगलीत छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा जीर्णोद्धार अनावरण व नुतनीकृत हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिवछत्रपतींचं राज्य असताना कोणी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही
शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे आदर्श आहेत. भारतावर या पूर्वी अनेकांनी राज्य केलं, पण ती उलटली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांची राज्य होती. आदिलशाहाचं राज्य होतं, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते, महाराणा प्रताप यांचे राज्य होतं. ही राज्य आदिलशाहाचं राज्य, मोगलांचं राज्य असं म्हटलं जायचंय. एकमेव राजा होता, ज्याचं राज्य आडनावावरुन ओळखलं गेलं नाही. शिवछत्रपतींचं राज्य असताना कोणी भोसल्यांचं राज्य म्हटलं नाही. हे राज्य हिंदवी स्वराज्य, हे राज्य रयतेचं राज्य ही भूमिका शिवछत्रपतींची होती. हा विचार लोकांचा आत्मविश्वास वाढवतो, असंही पवार यांनी नमूद केलं.
हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते
पुढे बोलताना शरद पवार, आज मराठा रेजिमेंट देशाच्या सर्व भागाचं संरक्षण करते. देशात राजपुतांची रेजिमेंट आहे. पंजाबी लोकांची रेजिमेंट आहे, अन्य लोकांची रेजिमेंट आहे. पण देशाच्या सामान्य लोकांच्या मनामध्ये मराठा रेजिमेंट आहे. रेजिमेंटचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते आहे. मला आठवतय या देशात सर्वात उंच ठिकाण हिमालयात आहे. बर्फाच्छादीत असलेला प्रदेश आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन नाही, त्याठिकाणी मराठा रेजिमेंट आहे. पलिकडच्या बाजूला पाकिस्तानची सीमा आहे, अशा ठिकाणी जाऊन या देशाचं रक्षण करतो, तो जवान मराठा रेजिमेंटचा आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या