एक्स्प्लोर

शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, राज्यसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही!

Rajya Sabha Election 2024: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे मविआचा उमेदवार पराभूत होऊ शकतो. अशावेळी शरद पवारांकडून एक मास्टरस्ट्रोक खेळण्यात आला आहे.

मुंबई: काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. परंतु, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला सहजपणे मिळू एका जागेवरही भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीसमोर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मविआचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून एक मास्टरस्ट्रोक खेळण्यात आला आहे.

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी मविआकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. सध्या मविआ आघाडीत सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, शरद पवार यांनी आता ऐनवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास तो मास्टरस्ट्रोक ठरु शकतो. 

राज्यसभेसाठी गुप्त मतदान, काँग्रेस आमदार क्रॉस व्होटिंग करणार?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होईल. यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन, शिंदे गटाला एक आणि अजित पवार गटाला एक जागा येईल. राज्यसभेच्या एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 40.9 चा कोटा आवश्यक आहे.  त्यामुळे एका जागेवर  काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या गटाचे काँग्रेस आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने मविआची मतं फुटली होती. त्याची पुनरावृत्ती यावेळीही होऊ शकते.

आणखी वाचा

आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय: अशोक चव्हाण

पक्षांतरबंदीमुळे आम्ही येऊ शकत नाही, पण आमचा पाठिंबा तुम्हाला; काँग्रेस आमदारांचा अशोक चव्हाणांना फोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget