बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आजच बिगुल वाजवण्याची शक्यता आहे.

Beed: स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आपल्या परीने युती आघाडी करा. मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलंय. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याबाबतची माहिती दिली. (Muncipal Corporation Election Beed)
राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आजच बिगुल वाजवण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये केवळ भाजपलाच विरोध करण्यात आलाय. त्यामुळे बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत बीडमधील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आलं. या भूमिकेमुळे मित्र पक्षात अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय.
Sharad Pawar: शरद पवारांची रणनीती काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फक्त भाजप सोबत युती करू नका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केलंय. बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेत आष्टी मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले. ते म्हणाले," स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आपल्या परीने युती आघाडी करा. मात्र भाजपसोबत कुठल्याही परिस्थितीत युती करू नका असे आवाहन शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केल्याचं राजेंद्र मस्के म्हणाले.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदार संघात अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे यांच्याशी केल्या जाणाऱ्या आघाडीमुळे शरद पवार गट अजित पवार गटाशी हातमिळवणी करू शकतो असे संकेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिले. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे बीड जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
























