एक्स्प्लोर

पेट्रोल-गॅस महागला, 100 पैकी 87 जण बेरोजगार; शरद पवारांनी मोदींच्या गॅरंटीचा हिशेब मांडला, ऑडिओ क्लिपही ऐकवली!

Sharad Pawar in Madha Loksabha:शरद पवारांनी मोदींचा 'करेक्ट' कार्यक्रम केला. 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांची एक-एक करुन पोलखोल केली. मोदींनी त्यांचा शब्द पाळलेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. भाजप काय प्रत्युत्तर देणार?

माढा: आज देशाचा कारभार पंतप्रधान मोदी यांच्या हातात आहे. सत्तेत येताना मोदींनी अनेक आश्वासनं दिलं होती. नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 50 दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन दिले होते. मात्र,  आजची परिस्थिती बघता मोदी साहेबांनी (PM Modi) एकही शब्द पाळलेला दिसत नाही, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी माढा लोकसभा मतदारसंघातील मोडनिंब येथील प्रचारसभेत बोलत होते. 

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत, याचा हिशेब मांडला. देशातील लोकांना महागाईच्या संकटातून मुक्त करणार, हे मोदींचं पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. पण आता वाहनांची संख्या वाढली आहे. मोटारसायकल असो किंवा चारचाकी असो त्यासाठी पेट्रोलची गरज लागते. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, पेट्रोलचा दर 50 टक्क्यांनी खाली आणणार. 2014 मध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 71 रुपये इतका होता. त्यामुळे हा दर 50 रुपयांपर्यंत खाली येईल, असे सामान्य जनतेला वाटले होते. पण आज त्यांची सत्ता येऊन 3650 दिवस झालेत आणि पेट्रोलची प्रतिलीटर किंमत 106 रुपये इतकी आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात गेली, असे शरद पवार यांनी म्हटले. 

घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर लागतो. 2014 मध्ये गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये इतकी होती. आज हीच किंमत 1160 रुपयांवर पोहोचली आहे. मग या लोकांवर विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला. 

शरद पवारांनी मांडली देशातील बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी 

शरद पवार यांनी या प्रचारसभेत देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये सांगितलं होतं की, देशातील सर्व बेकारी घालवून सगळ्यांच्या हाताला काम देऊ. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने भारतातील रोजगारांचा आढावा घेतला. या अहवालात देशातील 100 लोकांपैकी 87 जण नोकरीविना असल्याची माहिती समोर आली. मग मोदींनी कसली बेकारी घालवली? त्या आश्वासनाचं काय झालं? मोदींना दिलेला शब्द पाळता आलेला नाही. मात्र, आता तेच मोदी ठिकठिकाणी जाऊन काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरुन उरला; सदाभाऊ खोतांची जळजळीत टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Embed widget