एक्स्प्लोर

Sadabhau Khot: देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरुन उरला; सदाभाऊ खोतांची जळजळीत टीका

Maharashtra Politics: माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत भाषेत टीका केली. शरद पवारांचं आडनाव फडणवीस असतं तर त्यांना कोणीही विचारलं नसतं, असे खोत यांनी म्हटले. तळागाळातील समाज मोदींच्या पाठिशी उभा राहील.

कोल्हापूर: देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरला, असे वक्तव्य रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केले. गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांसारख्या (Sharad Pawar) माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार तुमची जात वेगळी असतील, तुमचं नाव फडणवीस असतं तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगले नसते. परंतु, देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की, तो शरद पवार यांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवार यांना खोटं बोलत रेटून चालावे लागत आहे, असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहील. आम्ही सर्व लहान घटक पक्ष भाजपसोबत आहोत. कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत, सगळे अलीबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मुठमाती मिळणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल: सदाभाऊ खोत

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल, असं चित्र निर्माण झाले आहे.  पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

राजकारणात चढउतार, उन्हाळा-पावसाळा असतो: सदाभाऊ खोत

मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळीतले सर्व चढ उतार पाहिले आहेत. कधी मी आमदार,  मंत्री होईन असं वाटलं नव्हतं. मी आमदारकीचे शिवार बघितलं, मंत्रीपदाचं शिवार बघितलं, मग माझ्या लक्षात आलं शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो, तसं राजकारणातल्या शिवारात देखील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतो. राजकारणात हिवाळा आला की गारव्याला लोक येतात, उन्हाळा आला की गडी पळून जातात आणि पाऊस लागला की नाचायला लागतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. 

आणखी वाचा

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार आणि तुम्ही पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, एकदा मतदान होऊ द्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog: अंबरनाथ उड्डाणपुलावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Rishabh Pant : दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या जागी कोणाला संधी देणार? पत्रकारांचा प्रश्न कॅप्टन रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
शुभमन गिलच्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी देणार? रिषभ पंत उत्तर देत म्हणाला...
Ram Mandir :  श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
श्रद्धा आणि पवित्रतेचा स्पर्श, अयोध्येच्या राम मंदिराचे मनमोहक फोटो
IND A vs BAN A : भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये जितेश शर्माचे दोन निर्णय चुकले, बांगलादेश अंतिम फेरीत
भारत आशिया कप रायझिंग स्टार्समधून बाहेर, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश विजयी, जितेश शर्माचं काय चुकलं
Tejas Fighter Jet Crashed: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Video: दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; व्हिडिओ पाहून धडकी भरायची वेळ, पायलटचा थांगपत्ता नाही
Embed widget