एक्स्प्लोर

निवडणुकीपूर्वी घड्याळाचा फैसला करा, नाही तर चिन्ह गोठवा, शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे.

मुंबई सध्या सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे (Vidhan Sabha Election) . दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडतील अशी सध्या चर्चा सुरू आहे. याचमुळे सगळे पक्ष कामाला देखील लागलेले आहेत. अशात   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी सुप्रीम कोर्टाला (Supreme Court)  विनंती केली आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या, अशी विनंती शरद पवारांनी सु्प्रीम कोर्टाला केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी  चिन्हाबाबत निर्णय होणं महत्त्वाचे आहे, अशी विनंती  शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला  केली. जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं, असे शरद पवार म्हणाले.   घड्याळ या  चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको, अशी विनंती शरद पवारांनी  सुप्रीम कोर्टाला केली आहे.

शरद पवारांना तुतारी चिन्ह

लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' असं नाव दिलं होतं तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. त्या चिन्हावर निवडणूक लढवून शरद पवारांनी आठ खासदार निवडून आणले. दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकच खासदार निवडून आला.  

विधानसभेलाही तुतारी चिन्हावर लढावे लागण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाचे यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.  

याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू 

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर वाद सुरू झाला. पक्षाचे जवळपास 43 आमदार आहेत तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) 12 आमदार आहेत. त्या आधारे निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं.  सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. या याचिकांवर तारीख पे तारीख सत्र सुरू आहे.  

 हे ही वाचा :

Maharashtra Politics : लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'NCP', तर शिवसेनेचा 'शिवसेना शिंदे' असा उल्लेख

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget