एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता, शरद पवारांनी सातारचं गणित मांडलं
Sharad Pawar on Satara Loksabha : साताऱ्याची जागा आमच्या अध्यक्षांनी जाहीर केली. साताऱ्याचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे.
Sharad Pawar on Satara Loksabha : साताऱ्याची जागा आमच्या अध्यक्षांनी जाहीर केली. साताऱ्याचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना पक्षाने संधी संधी दिली आहे. एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता, अशा प्रकारची लढत साताऱ्यात होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. शरद पवारांनी बारामतीतील माळेगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पक्षप्रवेश झाल्यानंतर धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जाहीर होईल
शरद पवार म्हणाले, अकलूजमधून अनेक सहकारी भेटायला आले. त्यामध्ये धैर्यशील यांचे नाव पुढे आलं. पक्षाचे अध्यक्ष अकलूजमध्ये त्यांना प्रवेश देतील. पक्षप्रवेश झाल्यानंतर धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जाहीर होईल. या सबंध मतदारसंघामध्ये तरुणांचा पाठिंबा दिसतोय. आम्ही लवकरच पक्षात च्या उमेदवाराचं नाव जाहीर करू, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं.
नवीन लोक जे येतात त्यांचे स्वागत
नामदेव ताकवणे यांनी आमच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आम्हाला आनंद आहे. भाजपचे अध्यक्ष हे आमच्या पक्षात येऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यास तयार आहेत. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे, तिथे नवव्यवस्थापन आहे. नवीन लोक जे येतात त्यांचे स्वागत त्या साखर कारखान्याच्या राजकारणात अधिक लक्ष देण्याची भूमिका आमची नाही. हा कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) नमूदं केलं.
शरद पवारांकडून विरोधकांच्या भेटीगाठी
चंद्रराव तावरे आणि मी एकाच शाळेत शिकलो. सुप्रियाच्या लग्नात अनेक पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांची सोय करायला जे आमचे सहकारी पुढे होते. त्यामध्ये चंद्रराव तावरे यांचे नाव येतं. कालांतराने त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असं शरद पवार चंद्रराव तावरे यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले. काकडे कुटुंबियांच्या भेटीवरही शरद पवारांनी भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, त्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली म्हणून मी गेलो होतो. बाबा काकडे गेल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो होतो. हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. एखादं कर्तुत्ववान व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबांचे सांत्वन करणे ही आमची जबाबदारी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या