Sharad Pawar on Nilesh Lanke : संसदेत विचारतील हा कोण गडी आणला, निलेशजी मराठीत काय बोलतील याचा भरोसा नाही, शरद पवारांकडून लंकेंवर कौतुकाचा वर्षाव
Sharad Pawar on Nilesh Lanke, Ahmednagar : "खर सागायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे. जे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील, हा कोण गडी याठिकाणी आणला"
Sharad Pawar on Nilesh Lanke, Ahmednagar : "खर सागायचं म्हणजे निलेश लोकसभेत चालल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे. जे आमचे सभासद आहेत, त्यामध्ये जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंटमध्ये सगळेजण नक्की विचारतील, हा कोण गडी याठिकाणी आणला. मी त्यांना सांगितलं, तिथे मराठीत सुद्धा भाषण करता येत. तुम्ही मातृभाषेत बोलू शकता. एकदा का माईक हातात आला तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही. त्याबद्दल कमतरता भासणार नाही", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलाय. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.
मला यंदाच्या वर्षी संसद आणि विधानसभेत जाऊन 56 वर्षे पूर्ण होतील
शरद पवार म्हणाले, मला यंदाच्या वर्षी संसद आणि विधानसभा इथं जाऊन 56 वर्षे पूर्ण होतील. आणखी किती वर्ष राहायचं? मला एकाही दिवसाची सुट्टी नाही, असं काम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर सोपवले. त्यामुळे माझ्याकडे जे ज्ञान असेल ते नव्या 8 खासदारांच्या मागे असेल. सुदैवाने सुप्रिया आणि अमोल कोल्हे हे अनुभवी सदस्य त्यांच्यासोबत आहे. दोघांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांचीही मदत नव्या लोकांना होईल. जिल्ह्यातील प्रश्न संसदेत मांडले जातील. नवे खासदार अष्टप्रधानमंडळाप्रमाणे महाराष्ट्राच्या हिताची जपवणूक करतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
नेहरुंनी या किल्ल्यात असताना डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे लिखाण केले
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आजचा दिवस पक्षाचा वर्धापनदिन आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने 10 पैकी 8 जागा निवडून आम्हाला उत्तम प्रकारे साथ दिली. 25 वर्षांपूर्वी आपण पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं हे ठरवलं. पण भाग्य असं पक्ष स्थापन केला आणि तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून जवळपास 17 ते 18 वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. एवढचे नव्हे तर महाराष्ट्राबरोबर केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. केंद्रातील सरकारमध्ये राष्ट्रवादीचा वाटा महत्वाचा होता. रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करण्याची अहमदनगरची निवड केली. कारण आहिल्यादेवी होळकरांचे कर्तृत्व त्यांची दृष्टी, त्यांचं प्रशासन कौशल्य हा तुम्हा आम्हाला अभिमान वाटणारा विषय आहे. आहिल्यादेवींची दुसरी एक बाजू आहे. ती देशांच्या स्वातंत्र्याची आहे. अहमदनगरला महत्वाचा कार्यक्रम गांधींजींच्या नेतृत्वात झाला. महात्मा गांधी भारत जोडो यात्रा केली. गांधींना पोलिसांनी अटक केली, काँग्रेसची कार्यकारणी होती. अनेक महत्वाचे नेते होते. इंग्रजांना या कार्यकारणीच्या नेत्यांना अटक केली. सर्वांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवले. नेहरुंनी या किल्ल्यात असताना डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे लिखाण केले. स्वातंत्र लढ्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले. यामध्ये दोन लोक महत्वाचे होते. अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन हे गांधींचे महत्वाचे सहकारी होते. ते नगर जिल्ह्यातून पुढे आले होते. अशा नगरीमध्ये आपण जमलो आहोत. स्वातंत्र्याचे अगोदर वेगळे प्रश्न होते आता वेगळे प्रश्न आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar on Narendra Modi : आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, शरद पवारांचा पीएम मोदींवर हल्लाबोल