Sharad Pawar on Ajit Pawar : कुठल्या का होईना बहिणींना द्या, लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला
Sharad Pawar on Ajit Pawar, Satara : घरातील लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा, या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का? असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत विचारला होता.
Sharad Pawar on Ajit Pawar, Satara : घरातील लाडक्या बहिणीकडे दुर्लक्ष करायचे आणि बाहेरच्या बहिणींना निधी द्यायचा, या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धोरणाचा आगामी निवडणुकीत फायदा होईल का? असा सवाल पत्रकारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय. "कुठल्या का होईना बहिणींना द्या", असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल. आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी यामुळे फटका बसला. सातारा लोकसभा मतदारसंघात देखील आम्हाला फटका बसला आहे. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिला. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मी काही इतिहासाचा जाणकार नाही : शरद पवार
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या वाघनखाबाबतच्या वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे. इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे, योगदान आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असंही शरद पवारांनी सांगितलं.
शाहू महाराज यांनी सर्वसामान्य गरिबांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले
महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी काम केलं. शाहू महाराज यांनी सर्वसामान्य गरिबांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. परराज्यात देखील आपल्या राज्यातील मान्यवरांची नाव जिल्ह्यांना दिली आहेत. पर्यावरणाची चर्चा केली जाते मात्र पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी आदिवासी समाज खऱ्या अर्थाने काम करतो. अलिकडच्या राज्यकर्त्यांकडे योजना आहेत मात्र त्याची अंमलबजावणी जबाबदारी असणाऱ्यांकडून पार पडली जात नाही. महिलाबाबत 1500 रुपये याबाबत घोषणा केलीय. राज्य सरकारने अंदाजपत्रकात जी तरतूद केली आहे आणि आर्थिक परिस्थिती यात खूप अंतर आहे, असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या