एक्स्प्लोर

Sharad Pawar NCP Candidate List : दिलीप वळसे, हसन मुश्रीफ ते अजित पवार, दिग्गजांना घेरण्यासाठी शरद पवारांचे तगडे उमेदवार मैदानात!

Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज (दि.24) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Sharad Pawar NCP Candidate List : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये महायुती सरकारमध्ये सामील झाले. महायुतीत सामील होत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) निर्णयाला साथ देत अनेकांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांनी जवळपास 9 जणांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती. दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेल्या दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी तगडे उमेदवार मैदानात उतरवलं आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज (दि. 24) 45 उमेदवार जाहीर केले आहेत. 

दिलीप वळसेंविरोधात देवदत्त निकम यांना उमेदवारी 

दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात शरद पवारांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर हा तगडा उमेदवार मैदानात उतरवण्यात आला आहे. देवदत्त निकम दिलीप वळसे पाटलांना तगडं आव्हान उभं करतील, असे बोलले जात आहे. 

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना तिकीट 

शरद पवारांनी अजित पवारांना घेरण्यासाठी देखील रणनीती आखली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युगेंद्र पवार लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले होते. त्यांनी सुळेंसाठी जोरदार प्रचार केला होता. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी शरद पवारांकडे केली जात होती. आता शरद पवारांनी युगेंद्र पवारांना मैदानात उतरवलं आहे. 

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजीत घाटगेंना उमेदवारी 

दिलीप वळसे आणि अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ यांनी देखील शरद पवारांची साथ सोडली होती. शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांना घेरण्यासाठी समरजीत घाटगे यांना भाजपमधून आयात केले होते. आता समरजीत घाटगेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कागलमध्ये गेल्यावेळी तिरंगी लढत झाल्याने हसन मुश्रीफ यांचा विजय झाला होता. आता हसन मुश्रीफ यांच्यापुढे समरजीत घाडगेंचं तगडं आव्हान असणार आहे. 

दत्तात्रय भरणेंविरोधात हर्षवर्धन पाटील मैदानात 

अजित पवारांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. दत्तात्रय भरणे यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात जोरदा प्रचार केला होता. त्यामुळे आता सुप्रिया सुळे देखील हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभारल्या आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील हजेरी लावली होती. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवार जाहीर

जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा 
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर 
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव  पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा 
सुनील भुसारा- विक्रमगड 
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर 
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर 
चंद्रकांत दानवे- भोकरदन 
चरण वाघमारे- तुमसर 
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर 
पृथ्वीराज साठे- केज 
संदीप नाईक- बेलापूर 
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी 
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर 
रविकांत बोपछे- तिरोडा 
भाग्यश्री अत्राम- अहेरी 
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार - बारामती 
संदीप वर्पे- कोपरगाव
 प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी 
करमाळा-नारायण पाटील  
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर  
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे - कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ 
प्रशांत जगताप -हडपसर

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget