Sharad Pawar : काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण, त्यांची स्थिती चिंताजनक, दारिद्र रेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखी नाही : शरद पवार
Sharad Pawar, मुंबई : "मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही."
Sharad Pawar, मुंबई : "मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.
तेव्हा यशवंत चव्हाण यांनी सभागृहाची माफी मागितली होती
शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे. ही संसद अशी आहे की सुंसावाद साधण्याची संधी मिळत असते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री होते. त्यांची पार्श्वभूमी तुमच्यासारखी अत्यंत सामान्य होती. कराडला त्यांची आई असायची. ते घरी गेले तेव्हा आईने विचारले तहसीलदार झाला का? एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी होतो त्यावेळी एसएम जोशी काही प्रश्न विचारत होते. त्यांना एक मंत्री उत्तर देत होते ते उत्तर एसएम जोशी यांना पटत नव्हतं. त्यांना तीन वेळा उत्तर दिल्यानंतर त्या मंत्र्यांनी अध्यक्षांनी सांगितले मी तीन वेळा उत्तर दिले यांच्या डोक्यात जात नाही. तेव्हा यशवंत चव्हाण यांनी सभागृहाची माफी मागितली आणि म्हटले ह्या सभागृहात असे बोलता कामा नये.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, वेगवेगळ्या भागात काम करणाऱ्या लोकांना एक व्यासपीठ मिळायला हवे अशी त्यांची भावना होती. त्यामुळं राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषद सुरू केले. आमचा प्रयत्न हाच आहे सरकार कोणाचे असो पण राष्ट्रभाषा टिकायला हवी. लोकांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचायला हवे. फुले यांनी जो विचार मांडला त्याचा प्रचार कसा होईल ह्याचा विचार व्हायला हवा. महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारात आधुनिकता होती. त्यांनी महिलांचे शिक्षण हा आधुनिकतेचा विचार केला त्यात सावित्री बाईंचे योगदान विसरता काम नये. मी नेहमी सांगतो हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा आहे.
ह्या देशात कामगारांचे कायदे नव्हते ते कायद्याचे मुद्दे स्वातंत्र्याआधी बाबासाहेबांनी उपस्थित केले
संविधान यांच्या निर्मिती मध्ये डॉ आंबेडकरांचे योगदान आहे. मी 10 वर्ष मंत्री कृषी मंत्री होतो. शेतीचा दुसरा प्रश्न वीज, पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा. ह्या देशाचं सर्वात मोठं धरण पंजाब हरियाणामध्ये आहे. ह्या धरणाचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला. ते तिथेच थांबले नाही धरणाच्या पाण्याने वीज कशी करता येईल ह्याचा विचार केला. ह्या एवढ्या विजेला एका भागातून दुसऱ्या भागात कसे न्यायचे ह्यासाथी महामंडळ केले. बाबासाहेबांचं आधुनिकतेचं विचार होता. ह्या देशात कामगारांचे कायदे नव्हते ते कायद्याचे मुद्दे स्वातंत्र्याआधी बाबासाहेबांनी उपस्थित केले. अश्याच कामात जबाबदारीने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून तुम्ही करत आहात. त्यामागे चव्हाण सेंटर तुमच्या मागे उभे आहे. मांडलेलं प्रश्न ह्याची नोट माझ्यासामोर आहे. शेतकऱ्याच्या घामाची किंमत त्यांना चांगली मिळायला हवी, असंही शरद पवारांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Ramraje Naik Nimbalkar : तक्रार रणजितसिंह निंबाळकरांबाबत आहे, वरिष्ठांच्या कानावर घालू, अन्यथा तुतारी वाजवू; रामराजे निंबाळकरांचा इशारा