Sharad Pawar in Indapur : साहेब इंदापूरचा आमदार बदला, त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत; शेतकऱ्यांच्या शरद पवारांसमोर घोषणा
Sharad Pawar in Indapur : "साहेब तुम्ही इंदापूरचा आमदार बदला, त्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत. इंदापूरात आप्पासाहेब म्हणतील तसंच होणार", अशा घोषणा शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर दिल्या आहेत.
Sharad Pawar in Indapur : "साहेब तुम्ही इंदापूरचा आमदार बदला, त्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत. इंदापूरात आप्पासाहेब म्हणतील तसंच होणार", अशा घोषणा शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर दिल्या आहेत. शरद पवारांनी आज इंदापूर (Indapur) तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शरद पवार म्हणाले, 4-6 महिने थांबा. मला राज्य सरकार बदलायचे आहे. त्यानंतर शेतकरी म्हणाले की, इंदापूरचा आमदार बदला. त्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत.
दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचे पाणी घेतो, हे थांबले पाहिजे
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्यावेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. नियमित पाणी आहे, ते मिळायला पाहिजे. माझा दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचे पाणी घेतो, हा उद्योग थांबल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. माझ्या डोक्यात असं आहे की, हा तुमचाच प्रश्न आहे असं नाही. आम्ही जाईल तिथे लोक म्हणतात दुधाच्या भावासंबंधी राज्य सरकारपुढे म्हणणे मांडावे लागेल, असे आश्वासही शरद पवारांनी दिले.
4-6 महिन्यात राज्य सरकार बदलायचे आहे : शरद पवार
शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, पाणी- चाऱ्या बाबत आता काही करू शकत नाही. मुंबईत गेल्यानंतर सरकारमधील लोकांशी याबाबत भाष्य करेन. चार महिन्यांनी निवडणुका येतील,आमचा प्रयत्न आहे की काहीही करून सरकार बदलायच आहे. तोवर काही करू शकत नाही. येथील जमीन करायला नरेंद्र मोदी येणार नाहीत. काहीही होऊद्या जमीन करायची. पाणी प्रश्न सोडवा, अशी मागणी आपण करुयात.
सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत
आजच्या घडीला संसार चालवायला, दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीचे काम होते, त्यावेळी कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी मी विनंती करतो, असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar : चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे : शरद पवार