एक्स्प्लोर

Sharad Pawar: माझं बोट धरुन राजकारणात आलेले आज माझ्याबद्दल काय बोलतायत, होय मी भटकती आत्मा, पण...; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

Shirur Lok Sabha: होय मी भटकती आत्मा, लोकांचं दु:ख बघून अस्वस्थ होतो, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मी लाचार होणार नाही; शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर. शरद पवारांचं शिरुरमध्ये भाषण. लोकांची दु:ख पाहून मी अस्वस्थ होतो.

शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या (Sharad Pawar) बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) टीकेला प्रत्युत्तर दिले. सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. 

मोदी म्हणतात की, मी तडफड करतो. होय, मी लोकांचं दु:ख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान काल म्हणाले मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय, असे शरद पवार यांनी म्हटले. 

आयुष्यात सर्वप्रथम शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाणांना पाहिलं: शरद पवार

1960 साली मी पुण्यात शिक्षण घेत होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांबद्दल मला प्रचंड आदर होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. हे मराठी राज्य व्हावं यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. तो दिवस होता 1 मे 1960. त्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो, या चळवळीत आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण शिवनेरी वर येऊन घोषणा करतील आणि मग पंतप्रधान मुंबईमध्ये अधिकृत घोषणा करतील. ही बातमी आम्हाला समजताच, आम्ही सगळे शिवनेरी आलो. आयुष्यातील पहिल्यांदा मी शिवनेरीवर आलो, त्यावेळी प्रथमतः यशवंतराव चव्हाणांना आम्हाला पाहता आलं. हे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. पुढं याचं महाराष्ट्राचे नेतृत्व करायला मिळालं. साल होतं 1967, त्यापुढं मी 14 वेळा निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्या. जनतेचं दुखणं मांडण्याची संधी मला जनतेने दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा

मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आलीय, मोदींचा माढ्यात शरद पवारांवर हल्लाबोल

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget