Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली आहे.
Ajit Pawar meets Sharad Pawar : आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज दिल्लीतील 6 जनपथ येथे शरद पवार यांची अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. त्यांचं दर्शन घेतलं, चहा-पाणी झालं. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. परभणीला काल असे का घडले? राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.
राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात
शरद पवारांच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आम्ही तिघांनीच आतापर्यंत शपथ घेतली आहे. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? 16 तारखेपासून अधिवेशन आहे. त्यावेळेस मंत्री असणे गरजेचे असते याबाबत आमची चर्चा झाली. राजकारणात टीका-टिप्पणी होत असते. पण, राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रात कसे राजकारण करायचे ते शिकवले आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले की, ते आमच्यासाठी आदरणीय, वंदनीय आहेत. दरवर्षी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतो. त्यांचा आशीर्वाद घेत असतो. यावर्षी सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो, असे त्यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या