(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar and Rahul Gandhi : शरद पवारांनी राहुल गांधींना वारीचं महत्त्व सांगितलं, वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं
Sharad Pawar and Rahul Gandhi, New Delhi : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीचे महत्त्व सांगितले.
Sharad Pawar and Rahul Gandhi, New Delhi : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज (दि. 2) दिल्लीत भेट झाली. शरद पवार यांनी राहुल गांधी यांना आषाढी वारीचे महत्त्व सांगितले. शिवाय वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तर पंढरपूरच्या वारीला येण्याबाबत लवकरच कळवतो, असं राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटीलही उपस्थित होते.
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंढरपूरच्या वारीचे निमंत्रण दिले. शिवाय, शरद पवार यांनी राहुल गांधींना वारीचे महत्वही सांगितले. नियोजन करून वारी बाबत कळवतो अस राहुल गांधी म्हणाले. त्यांचं ठिकाण कोणतं ठरतं , त्यावरुन त्यांचं घरी येण्याचं ठरेल.
पंतप्रधानांनी राहुल गांधींना बालीश म्हणणे चुकीचे आहे
पीएम मोदींवर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधी पक्ष नेते आहेत. पंतप्रधानांनी त्यांना बालीश म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी देशाच्या विकासावर बोलायला हवं होतं. मणिपूर आणि NEET वर चर्चा करावी ही मागणी होती मात्र सरकार त्यावर बोललं नाही.
पंतप्रधान किती संवेदनशून्य आहेत हे आज दिसून आलं
खासदार अमर काळे (Amar Kale) म्हणाले, पंतप्रधान यांच्या स्टेटस नुसार त्यांचं वक्तव्य असावं पण ते आज दिसलं नाही. राहुल गांधी यांना बालिश बुद्धी म्हणाले यांचा मी निषेध करतो. तसंही मोदींकडून दुसरी अपेक्षा नाही. राहुल गांधी यांचं भाषण हे अभ्यासपूर्ण होतं. माझ्या माहितीनुसार त्यांचं भाषण सुरू असताना त्यांना चिठ्ठी आली होती. मात्र तरीही ते 1 तास भाषण करत राहिले. श्रद्धांजली दिली की लगेच हसून त्यांनी भाषण केल हे देशाने पाहिलं. पंतप्रधान किती संवेदनशून्य आहेत हे आज दिसून आलं.
इतर महत्वाच्या बातम्या