Sharad Pawar-Ajit Pawar Meet Delhi: गौतम अदानी, अजित पवार, राहुल-प्रियांका गांधींपासून श्रीकांत शिंदे जया बच्चनपर्यंत...; शरद पवारांना दिल्लीत कोण कोण भेटले?, संपूर्ण यादी समोर
Sharad Pawar: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त राजधानी दिल्लीत काल (10 डिसेंबर) दिग्गज एकवटले होते.

Sharad Pawar: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमत्त राजधानी दिल्लीत काल (10 डिसेंबर) दिग्गज एकवटले होते. विशेष म्हणजे अजित पवार (Ajit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) आणि प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्याचसोबत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) अनेक खास पाहुणे पवारांच्या निवासस्थानी आले होते. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीत वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांना काल दिल्लीत कोण-कोण भेटले याची, संपूर्ण यादी समोर आली आहे.
शरद पवारांना दिल्लीत कोण-कोण भेटले?
- गौतम अदानी
- अजित पवार
- प्रफुल्ल पटेल
- जयवीर शेरगिल
- कनिमोळी, डीएमके
- रवनीत सिंग बिट्टू, भाजप
- डेरेक ओ ब्रायन, तृणमुल
- गौरव गोगोई, लोकसभा उपनेते काँग्रेस
- अनिल देसाई , शिवसेना ठाकरे
- गुलाम नबी आझाद
- प्रतिभा अडवाणी, ( लालकृष्ण अडवाणींची कन्या )
- मणिक्कम टागोर , काँग्रेस
- शहानवाज हुसेन , भाजप
- डी. पुरंदेश्वरी , भाजप
- विप्लव देव , माजी मुख्यमंत्री भाजप त्रिपुरा
- पी चिदंबरम , काँग्रेस
- ओमर अब्दुला सहकुटुंब
- अनुप धोत्रे भाजप खासदार ( सहकुटुंब)
- दिग्विजय सिंग , माजी मुख्यमंत्री काँग्रेस
- कमलनाथ , माजी मुख्यमंत्री काँग्रेस
- बैजयंत पांडा , भाजप खासदार
- सचिन पायलट, काँग्रेस
- राहुल गांधी
- प्रियांका गांधी
- पार्थ पवार
- मिलिंद देवरा, शिवसेना खासदार
- श्रीकांत शिंदे
- निशिकांत दुबे भाजप खासदार
- धैयशील माने शिवसेना खासदार
- राजीव शुक्ला
- नवीन जिंदाल, भाजप
- जया बच्चन
- दिग्विजय सिंह
- मुकुल रोहतगी , सर्वोच्च न्यायालय वकील
- कपिल सिब्बल , वकील , सर्वोच्च न्यायालय
- शक्तीसिंह गोहिल, राज्यसभा , काँग्रेस
- रणदीपसिंह सुरजेवाला , राज्यसभा काँग्रेस
- पवन खेडा, राष्ट्रीय प्रवक्ता काँग्रेस
- प्रवेश वर्मा , भाजप दिल्ली जल मंत्री
- राघव चड्डा, आम आदमी पक्ष
- सागरिका घोष, टीएमसी खासदार
- रेवंथ रेड्डी























