एक्स्प्लोर

महाविकास आघाडीचे ठरलं! 218 जागांवर एकवाक्यता; अंतिम यादीबाबत खासदार अमोल कोल्हेंची माहिती, म्हणाले....

Amol Kolhe: आमच्या पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक इच्छुक लोकांच्या मुलाखती झाल्या आहेत. आमच्या पक्षात एकूण 1600 लोकांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर होत आहे, निवडणुका देखील जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. मात्र याआधीच निवडणूक होईल असे वाटत होते.  पण तसे झाले नाही. आमच्या पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक इच्छुक लोकांच्या मुलाखती झाल्या आहेत. आमच्या पक्षात एकूण 1600 लोकांनी मुलाखती दिल्यात. लोकसभेत राज्यातील लोकांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) विश्वास दाखवला. आमची महाविकास आघाडी म्हणुन तयारी पूर्ण झाली आहे. तर जागावाटप अंतिम टप्प्यात आल असून  पुढील 2-3  दिवसात अंतिम निर्णय होईल. अशी माहिती खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी यावेळी दिली. 218 जागांवर एकवाक्यता झाली आहे. त्या बाबत 2-3 दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

निवडणुकीची सोय म्हणुन शपथविधी?

राज्यपाल नामनिर्देशित 7 आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. राजभवनातील सोहळ्याला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. निकाल प्रलंबित असताना 12 पैकी 7 आमदारांची नियुक्ती केल्याची हायकोर्टानं नोंद घेतली आहे. अंतिम निर्णय देताना आम्ही याबाबत आपलं मत देऊ, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसेच, निकाल राखून ठेवताना नियुक्त्यांना कोणतीही स्थगिती नव्हती, तसेच आम्ही तसं कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं, असं स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यानी दिलं आहे. दरम्यान याच मुद्द्याला घेऊन खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया देत टीका केली आहे. निवडणुकीची सोय म्हणुन हे केलं का, हि शंका आहे. कारण 12 जागा असताना केवळ 7 आमदारांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे निवडणुका समोर ठेवून हा शपथविधी तर केला जात नाही ना? अशी शंका त्यांनी बोलून दाखवली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सेनेने माझ्यासाठी खुप काम केलं-अमोल कोल्हे

राज्यात मोठी ताकत उभी राहत आहे. पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्यांचा विचार नक्की केला जाईल. फलटणकरांच्या मनात काय आहे, हे लोकसभेला समोर आल आहे. महविकास आघाडीचे आमदार निवडूण यावेत हीच आमची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही तसे प्रयत्न देखील करत आहोत माझ्यावेळी सगळ्यांनी काम केलं आहे, मला प्रत्येक मतदारसंघात लीड दिलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सेनेने माझ्यासाठी खुप काम केलं, है मान्य करावच लागेल. असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

महायुतीला घालवून महविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे   

दरम्यान, हडपसर मतदारसंघाच्या दाव्याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, दावा कुणीही करू शकतो. सगळे पक्ष तयारी करत असतात यात, गैर नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती आहे. सगळे नेते एकत्र येत निर्णय घेतील. एकून 65 मतदारसंघात आम्ही फिरलो आहोत. यात्रेच्या माध्यमांतून लोकांनी ठरवलं आहे की महायुतीला घालवून महविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. लोक आमच्याकडे येतात ही तर साहेबांची जादू आहे. तिथल्या नेत्यांना सगळ महिती असतं, लोकांनी ठरवून ठेवलं आहे. सरकारने योजनांची केवळ खैरत मांडली आहे. जाहिरातबाजी केल्याशिवाय सरकला पर्याय नाही, लोकांपर्यंत सरकारच्या योजना पोहचत नसल्याचेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 10 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaTop 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 Dec 2024Maharashtra Fake Crop Insurance Issue:  महाराष्ट्रात बोगस विम्याचं भरघोस पीकMumbai Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामधील अपघातानंतर राजकीय ओरोप-प्रत्यारोपांचं सत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget