Saroj Ahire : शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून त्रास होत राष्ट्रवादीच्या आमदाराची तक्रार, अजितदादांसमोर खदखद बोलून दाखवली
Saroj Ahire : शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून त्रास होत राष्ट्रवादीच्या आमदाराची तक्रार, अजित पवारांसमोर खदखद बोलून दाखवली

Saroj Ahire, Nashik : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या (शिवसेना शिंदे गटाच्या) नेत्यांकडून त्रास होत असल्याचे वक्तव्य आमदार सरोज अहिरे यांनी केलंय. मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं, असं सरोज अहिरे म्हणाल्या आहेत.
सरोज अहिरे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या या भूगोल गावांमध्ये या सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा करते अभिवादन करते. इतकी महान आणि पवित्र विचारधारा असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या सर्वांचे लाडके माननीय अजितदादा पवार मी आपल्या सर्व भगूर वासियांच्या वतीने दाद आपले मनःपूर्वक स्वागत करते. अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांचे स्वागत करते.
आनंदाचा दिवस आहे कारण सावरकरांचा जन्मभूमीत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले.
आपल्याला दुपारी पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेत आणि आपण त्याला आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. पाणीपुरवठा योजना कशी मंजूर झाली हे सांगते. हे सत्तेत 25 वर्ष होते ते करू शकले नाही. मी काम मंजूर करून आणायचे आणि त्याचे श्रेय घेण्याचे सत्र गेली पाच वर्ष सहन केली. तुमची लहान बहीण म्हणून तुमचा हात डोक्यावर राहू द्या. विकास कामे करत असतां अनेक प्रकारांचे त्रास मला दिला गेला. माझ्यासाठी तिकीटाची मागणी करायले आले, आपण सगळे दादांना सांगितले पाहिजे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे
- मी भगूर कारण आधीच सांगतो माजी ताब्यात तोडी बरी नाही
- ऐतिहासिक भगूर शहराचा हा अंदाचा दिवस आहे
- सरोजच्या प्रयत्नातून 24 कोटीच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना झाली
- भगूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी
- ही नगर परिषद शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे
- 100 वर्ष झेले म्हणून मी अर्थसंकल्पात काही मदत करता आली तर मी करेल
- मघाशी माझी ताब्यात बरी नव्हते मात्र मी दोघांचे भाषण ऐकले दोघांचे मागणे पूर्ण करेल मी शब्दाला पक्का आहे
- सरोजला दुसऱ्यांना तिकीट दिल्यानंतर तुम्हाला आव्हान केले
- मला नाशिक चे विशेष आभार मानायचे पुण्या नंतर मला नाशिकने सात आमदार निवडून दिले
- सगळ्यांची आमची जबाबदारी वाढली आहे
- सरोज यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले
इतर महत्त्वाच्या बातम्या






















