मास्तर करण्यासाठी 25 लाख घेतो, खासदार झाल्यावर 50 लाख दिले तर कलेक्टर, संतोष बांगरांचे ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारावर खळबळजनक आरोप
Santosh Bangar on Candidate of Thackeray Group : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर त्यांच्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत.
Santosh Bangar on Candidate of Thackeray Group : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर त्यांच्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा वादा ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती दाखवलेली निष्ठा असा प्रवास संतोष बांगर यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या शिंदेंचं कौतुक करणारा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला होता. आता संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार नागेश पाटील आष्टेकर यांच्यावर नाव न घेता खळबळजनक आरोप केले आहेत.
काय म्हणाले संतोष बांगर?
संतोष बांगर म्हणाले, नोकरीला लावतो म्हणून ठाकरे गटाचा उमेदवार पैसे घेतो. ग्रामसेवक करण्यासाठी दहा लाख रुपये घेतले. तलाठी करण्यासाठी वीस लाख रुपये घेतले. मास्तर करण्यासाठी 25 लाख रुपये घेतले. खासदार झाल्यावर कलेक्टरच करतो म्हणून 50 लाख देता का? हा धंदा उबाठाच्या उमेदवाराचा आहे, असे गंभीर आरोप संतोष बांगर यांनी केले आहेत. उबाठाचा उमेदवार गेल्या वेळेस चार नंबरला होता. आगामी लोकसभेला हा पाच नंबर वर गेल्याशिवाय रहाणार नाही, असा ठाम विश्वास इथल्या जनतेचा आहे, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला.
नागेश पाटील आष्टेकर ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टेकर यांचे नाव चर्चेत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नागेश आष्टेकर चौथ्या क्रमांकावर होते, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या वानखेडे यांचा दारुण पराभव केला होता. दरम्यान, आता या जागेवरुन ठाकरे गट नागेश आष्टेकर यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या