एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Bopdev Ghat Rape Case: जे बदलापुरात फडणवीस आणि मिंधेंनी केलंड तेच इथेही करावे. पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक घटना आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नाशिक : पुण्यात मित्रासोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यासह तिघांना अटक केली आहे. या प्रकरणावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बदलापूरच्या प्रकरणानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे 'बदला पुरा', असा आशयाचे बॅनर झळकले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे अत्याचार प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. 

संजय राऊत म्हणाले की, त्या तिघांचे एन्काऊंटर फडणवीसांनी करावे. जे बदलापुरात फडणवीस आणि मिंधेंनी केलंड तेच इथेही करावे. एका अल्पवयीन मुलीवर तिघेजण बलात्कार करतात हे बदलापूरपेक्षा भयानक घटना आहे. फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल आहे ते त्यांनी काढावे आणि फोटोमधून बाहेर यावं. फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं चालणार नाही. सरकारने एन्काऊंटर करावं. पोस्टरमधून त्यांनी बाहेर यावं, असे हल्लाबोल त्यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलाय. 

मिंधे सरकारकडून तिघांमध्ये भांडण लावण्याचे काम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण उपोषण करत आहेत. मिंधे सरकारकडून तिघांमध्ये भांडण लावण्याचे काम सुरु आहे. 

आमचं सरकार आला तर...

केंद्राने आरक्षण वाढवून देण्याची गरज आहे. आम्ही वारंवार हेच सांगत आहोत. आमचं सरकार आला तर आम्ही 50 टक्क्यांवर आरक्षण देऊ.  तात्काळ आरक्षण वाढवून सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. तामिळनाडूमध्ये आरक्षण टिकलेले आहे.  बिहारचे आरक्षण टिकले नाही, राज्य सरकारने देखील हा विषय केंद्राकडे न्यायला पाहिजे. आंदोलन कसे चिरडायचे हे आम्हाला महिती आहे, असं गृहमंत्री सांगतात. जरांगे यांच्या आंदोलनाला किंमत देत नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

सावरकरांना राज्य माता हा दर्जा मान्य नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते, असा दावा कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी केला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला त्याविषयी माहित नाही. असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. काँग्रेसने, भाजपने यावर बोललं पाहिजे. सावरकरांनी विज्ञान दृष्टीकोन ठेवला. खाण्या पिण्यावरून हिंदुत्व आणि इस्लाम ठरत नाही. सावरकरांनी गाई उपयुक्त पशु म्हटले आहे. सावरकरांच्या दृष्टीने गायी हे एक उपयुक्त पशु आहे. गाय बैलांची माता होती, असं सावरकरांचे म्हणणं होतं. सावरकरांना राज्य माता हा दर्जा मान्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

आणखी वाचा 

Bopdev Ghat Incident: तरुणाला बांधून ठेवलं, 21 वर्षीय तरुणीवर तिघांकडून अत्याचार, बोपदेव घाटातील हादरवणारा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget