एक्स्प्लोर

Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...

Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sanjay Raut on Sharad Pawar : गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांसोबत जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नाही. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का?

ते पुढे म्हणाले की, गौतम अदानींच्या घरी आजकाल राजकीय चर्चा होतात. महाराष्ट्राचे भविष्य ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचे विमानतळ ताब्यात घेतले. धारावीसह हजारो एकर मुंबईची जमीन गिळली. महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले. हे गौतम अदानी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. ते काय आचार्य विनोबा भावे आहेत का? गौतम अदानी म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. एक उद्योगपती राजकरण्यांच्या गटातटामध्ये मध्यस्थी करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे. मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून या देशात गोंधळ सुरू आहे. हा उद्योगपती महाराष्ट्रात राजकारण करणार, महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसत आहेत. मराठी म्हणून स्वतःला म्हणवून घेतात त्यांना लाज वाटली पाहिजे , असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 

आणखी वाचा 

Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget