एक्स्प्लोर

Sanjay Raut PC : एकनाथ शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव : संजय राऊत

Sanjay Raut PC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut PC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी के आहे. राजधानी दिल्लीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्यावरही निशाणा साधला.

नागपुरातील भूखंड घोटाळ्यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं. विरोधकांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ठाकरे गटाने दिल्लीतही शिंदे यांच्याविरोधात हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांकडेच एकनाथ शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

'देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीत आले'

मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीत आले आहेत. ते कशाला आले माहित नाही? पण नक्कीच त्यांची त्याविषयी चर्चा झाली असावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना 2 कोटी रुपयांना दिले. जे 16 भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. त्यावर काही निष्कर्ष काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने भूखंड वाटप केलं होतं. त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. आता भलेही न्यायालयाचं समाधान झालं असेल फक्त 24 तासात, तरीही तो भ्रष्टचार आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

अण्णा हजारे गप्प का?

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे.  सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. 110 कोटींचं नुकसान झालं, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

VIDEO : Sanjay Raut Full PC : दुतोंडी साप ते खोके सरकार, संजय राऊत यांचा अण्णा हजारे यांनाही सवाल


आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Savji: 'त्या' महिलांवर पोलीस केसेस दाखल करून नावे अन् फोटो जाहीर करा; माजी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, थेट राज्यपालांना पाठवलं पत्र, नव्या वादाला तोंड फुटणार?
'त्या' महिलांवर पोलीस केसेस दाखल करून नावे अन् फोटो जाहीर करा; माजी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, थेट राज्यपालांना पाठवलं पत्र, नव्या वादाला तोंड फुटणार?
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
Sahar Shaikh Mumbra AIMIM: कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्रकरण काय?
कैसा हराया...सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात येताच नॉट रिचेबल; वडीलही गायब, फोनही घेईनात, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Nashik News: नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget