एक्स्प्लोर

Sanjay Raut on Girish Mahajan : गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय, तो फडणवीसांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on Girish Mahajan : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Girish Mahajan : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, दोन दिवसांपासून खडसे साहेब सरकारच्या विरोधात आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधात ठामपणे बोलत आहेत. पुराव्यांसह बोलत आहेत. त्यानंतर पुढील 24 तासात ही कारवाई झाली. एकनाथ खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या दोन लोकांना मिस्टर महाजन आज प्रवेश देत आहेत. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर पक्षात आणण्याचा दबाव आणला आणि भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले, हे एक नवीन तंत्र आहे. 

गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय

आमचे सुधाकर बडगुजर होते,त्यांच्या कुटुंबीयांवर मकोकाच्या कारवाया केल्या. भाजपात गेले आणि रफादफा झालं. नगर जिल्ह्यातील आमचे शहरप्रमुख किरण काळे यांनी भ्रष्टाचाराविरोधात नगरमध्ये आंदोलन सुरू केले. 400 कोटींचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटणाचे कारण नाही. फडणवीस यांच्या राज्यामध्ये आम्हाला अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला सामोरे जावे लागेल. गिरीश महाजन नावाचा सांड हा मोकाट सुटलेला आहे. याला जर आवरले नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.  

एकनाथ खडसे सरकारवर तुटून पडल्याची किंमत मोजताय 

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं. आम्ही लढत आहोत आणि लढत राहू. पण तुम्हाला महाग पडेल. हे तुमच्यावर उलटेल तेव्हा तुम्हाला महाग पडेल. अमित साळुंखेचं काय झालं? अमित साळुंखेचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलाशी आहे. पोलीस कारवाई करणार आहेत का? रेव्ह पार्ट्या कोणाच्या होतात? आमचे चार खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले आहेत. त्यामध्ये नशेच्या पार्टीचा देखील संबंध आहे. नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही. हे सगळं भाजपने केले आहे. एकनाथ खडसे दोन दिवसांपासून सरकारवर तुटून पडले आहेत, त्याची किंमत ते मोजत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

आणखी वाचा 

Pune Crime Rave Party: पोलिसांना ऑनलाईन हाऊस पार्टीची टीप मिळाली, पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकताच समोर काय दिसलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget