(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut on CM Shinde : मुख्यमंत्री आत्ताच भाजपमध्ये गेलेत, त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? बेकायदेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी थेट निशाणा साधला आहे.
Sanjay Raut on BJP : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? असा परखड सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचं स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्यांची औकात काय? बेकायदेशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. शिवसेनेला संपवण्याचं भाजपचं स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या लोकांना फोडून त्यांना आमने-सामने आणलं आहे. त्यांनी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही लोक तोडून नवं सरकार स्थापन केलं आहे. आमच्याच लोकांना आमने-सामने उभं करत मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपनं केलं आहे."
दिवाळी आहे म्हणून, नाहीतर मुंब्य्राची शाखा आमच्याकडेच असता : संजय राऊत
"एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 40 लोक म्हणजे, शिवसेना नाही, खरे शिवसैनिक नाहीत. खरी शिवसेना आणि खरे शिवसैनिक काय ते काल (रविवारी) मुब्रांत पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे मुंब्र्यांत गेल्यानंतर जवळपास संपूर्ण मुंब्रा आणि ठाणं रस्त्यावर उतरलं होतं. हीच शिवसेना आहे. जर शिंदे मुख्यमंत्री नसले आणि पोलिसांचा वापर केला नसता, अशातच दिवाळी नसती, तर मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेचा ताबा आमच्याकडे असता. आम्हाला ऐन सणासुदीच्या काळात उगाच वाद उभा नाही करायचा. तुमचा पोलिसांवर दबाव आहे. उद्या हेच पोलीस आमचे आदेश मानतील मग तेव्हा तुम्ही काय कराल? मुंब्रातील शिवसेनेच्या शाखेबाबत एक कायदेशीर प्रक्रियाही सुरू राहील. शाखेचे सर्व कागदपत्र शिवसेनेकडे (ठाकरे गटाकडे) आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना नाही, ही गँग आहे. चोरांची टोळी आहे. सर्वोच्च न्यायालयानंही असंच म्हटलं आहे आणि कायदेशीर लढाईतही असंच म्हटलं आहे,"
तोडा आणि राज्य करा हीच भाजपची निती : संजय राऊत
"दोघांनी भांडणं करावी आणि आम्ही आमचं काम साध्य करुन घ्यावं, हीच भाजपची निती आहे. तोडा आणि राज्य करा हेच भाजपचं ध्येय. सत्ता, पैसा, आपल्या उद्योगपतींना धनवान बनणं. गरीबांना गरीब बनवणं हीच त्यांची निती.", असं संजय राऊत म्हणाले.
"मुख्यमंत्री पद गेलं की बार कुठुन उडेल ते कळेल. 31 डिसेंबरनंतर तुमचं मुख्यमंत्रीपद जाऊ देत मग तुम्हाला कळेल तुम्ही कोणत्या बारमध्ये आहात. भाजपच्या गुलामांनी, ज्यांनी मराठी माणसाची बेअब्रू केली आहे, त्यांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. मुंब्य्राला आम्ही गेलो, मुंब्य्राला हजारो शिवसैनिक रस्त्यावर होते. पोलिसांनी अडवलं, तुमच्याकडे सत्ता नसती तर चित्र वेगळं दिसलं असतं, दिवाळी आहे, आम्ही संजय राखला, याचे उपकार मानले पाहिजेत.", असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "शिंदे आत्ताच भाजपमध्ये गेले आहेत. तुम्ही जर त्यांची अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे. त्याशिवाय ते मुख्यमंत्रीपदी राहूच शकत नाही. आताच ते गुलाम झाले आहेत आणि गुलामांना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो."
पाहा व्हिडीओ : Sanjay Raut : मुख्यमंत्री आताच भाजपमध्ये,त्यांचं अंतर्वस्त्र पाहिल्यास कमळ दिसेल ABP MAJHA