एक्स्प्लोर

Vishal Patil: लढाई संपताच सगळे एकत्र, सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्ता मेळाव्याला विशाल पाटलांची उपस्थिती, चर्चांना उधाण

Maharashtra Politics: सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा संपन्न. मेळाव्यास आमदार विश्वजित कदम यांच्या बरोबर बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचीही उपस्थिती.

सांगली: सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

या स्नेहमेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली शहर (Sangli News) व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कडून या स्नेहमेळाव्याचे बायपास रोडवरील एका लॉनमध्ये आयोजन करण्यात आले होते. या  स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सांगलीमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आणि याच स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी देखील उपस्थित लावली. विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावल्याने आता सांगलीत चर्चांना उधाण आलेय.  पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विश्वजीत कदम हे कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून रोजी कळेल, असे विश्वजीत कदम यांनी थेट सांगितले होते. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसने नेमके कोणाचे काम केले हे पहावे लागणार आहे.

सांगलीत ठाकरेंच्या उमेदवारामुळे विशाल पाटलांची बंडखोरी

सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने महाविकास आघाडीने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती. स्थानिक काँग्रेसने विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. परंतु, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सांगलीची लढाई विशाल  पाटील Vs चंद्रहार पाटील Vs संजयकाका पाटील अशी तिरंगी झाली होती. 

आणखी वाचा

संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावली चक्क दुचाकींची पैज!

फिरलेल्या वाऱ्याचं वादळ झालंय, माझ्या मागं लाखो अदृश्य हात, भाजप हद्दपार होणार : विशाल पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Embed widget