Western Maharashtra MLA List : साखरपट्ट्यात कोणाचा दबदबा? सांगली, कोल्हापूर अन् सातारमधील आमदारांची यादी पाहा
Sangli, Kolhapur and Satara MLA List : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्र मोठं यश मिळालं.
Sangli, Kolhapur and Satara MLA List : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्र मोठं यश मिळालं. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज पुण्यात भाजपचे अधिवेशन घेत विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. त्यांनी पुण्यातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली. त्यामुळे विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2019 साली भाजप (BJP) आणि शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेना पक्ष 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
सांगली जिल्ह्यातील आमदारांची यादी
1. मिरज – सुरेश खाडे (भाजप)
2. सांगली – सुधीर गाडगीळ (भाजप)
3. इस्लामपूर – जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार)
4. शिराळा – मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)
5. पलूस कडेगाव – विश्वजीत कदम (काँग्रेस)
6. खानापूर – अनिल बाबर (शिवसेना) (31 , जानेवारी 2024 रोजी मृत्यू)
7. तासगाव-कवठेमहांकाळ – सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
8. जत – विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची यादी
1. कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील
2. कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव (मृत्यू) पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय
3. हातकणंगले - राजू जयवंत आवळे (काँग्रेस)
4. इचलकरंजी - प्रकाश आवाडे (अपक्ष)
5. करवीर - पीएन पाटील - काँग्रेस
6. राधानगरी - प्रकाश आबिटकर - शिवसेना
7. कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस) सध्या अजित पवार गट
8. शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)
9. शाहूवाडी - विनय कोरे (जनसुराज्य)
10. चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) सध्या अजित पवार गट
सातारा जिल्ह्यातील आमदारांची यादी (Satara MLA List)
1. फलटण – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
2. वाई – मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
3. कोरेगाव – महेश संभाजीराजे शिंदे (शिवसेना)
4. माण – जयकुमार गोरे (भाजप)
5. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
6. कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
7. पाटण – शंभूराजे देसाई (शिवसेना, शिंदे गट)
8. सातारा – शिवेंद्रराजे भोसले विजयी (भाजप)
इतर महत्वाच्या बातम्या
North Maharashtra MLA List : उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद? सर्व आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर