Samarjit Ghatge Kolhapur: मोठी बातमी : समरजित घाटगेंची घरवापसी, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला
Samarjit Ghatge Kolhapur: समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समरजित घाटगे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

Samarjit Ghatge Kolhapur: कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. समरजित घाटगे (Samarjit ghatge) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समरजित घाटगे यांचा अधिकृत भाजप पक्षप्रवेश होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांचे निकाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दावोस दौरा पूर्ण झाल्यानंतर हा पक्षप्रवेश केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Samarjit Ghatge Kolhapur: 8 जानेवारीला कागलमध्ये राजे गटाचा मेळावा
दरम्यान, 8 जानेवारी रोजी समरजित घाटगे कागलमध्ये राजे गटाचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीतून घाटगे आपल्या समर्थकांना पुढील दिशा देणार असल्याची चर्चा आहे. आता समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश नेमका कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Samarjit Ghatge Kolhapur: विधानसभा निवडणुकीवेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश
विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी थेट निवडणूक लढवली, मात्र या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर घाटगे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय युत्या पाहायला मिळाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्येही नगरपरिषद निवडणुकीदरम्यान अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
Samarjit Ghatge Kolhapur: हसन मुश्रीफ-समरजित घाटगे आघाडीला नगरपालिकेत घवघवीत यश
कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कागल नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत या आघाडीने 23 पैकी 23 जागा जिंकत पूर्ण ‘व्हाईट वॉश’ केला. याचबरोबर नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांचा विजय झाल्याने कागलमधील दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, कागलमध्ये मिळालेल्या या यशाला मुरगुड नगरपालिकेत धक्का बसला. मुरगुडमध्ये हसन मुश्रीफ–समरजिसिंह घाटगे यांच्या आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला असून, शिवसेना शिंदे गटाने येथे सत्ता खेचत विजय मिळवला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























