Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Mahayuti Seat Sharing, Chiplun-Sangmeshwar Vidhansabha : विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीत जागा वाटपावरुन (Mahayuti Seat Sharing) ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Mahayuti Seat Sharing, Chiplun-Sangmeshwar Vidhansabha : विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीत जागा वाटपावरुन (Mahayuti Seat Sharing) ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर (Chiplun-Sangmeshwar Vidhansabha) शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) दावा केला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) यांचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या जागेबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. दरम्यान, चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम (Shekhar Nikam) हे निवडून आले आहेत. त्यामुळे जागा वाटपावरुन महायुतीमध्ये संघर्ण निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले सदानंद चव्हाण ?
भाजप आणि शिवसेना अशी आमची युती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला. शेखर निकम हे जरी आमदार असले तरी या जागेवर शिवसेनेचा आमदार निवडून यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चिपळूणची जागा शिवसेनेला मिळणार नाही हे आताच बोलणे चुकीचे आहे. इथून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सदानंद चव्हाण यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासमोर महायुतीकडून उमेदवारी मिळवण्याची आव्हान असणार आहे.
नितेश राणेंचा मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघावर दावा
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून 48 हजार मतांनी विजय मिळवत विनायक राऊत यांचा पराभव केला होता. मात्र, मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातून नारायण राणे यांना लीड तर मिळाला नाहीच. शिवाय राणे या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडलेले पाहायला मिळाले. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. नितेश राणेंनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघावर दावा ठोकला होता. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाच्या वाट्याल येईल? याबाबतचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेते घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोकणातील जागा वाटपावरुन महायुतीमध्ये सातत्याने ठिणगी पडताना दिसत आहे. महाराष्ट्रातील 2 राजकीय पक्षात फूट पडल्यानंतर आता 6 प्रमुख पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले अनेक नेते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Vidhan Parishad Election BJP List : पंकजा मुंडेसह सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून पाच नावं जाहीर