दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये; रोहिणी खडसेंच्या प्रश्नावर रुपाली चाकणकरांचा पलटवार
महिला आयोागकडे पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीची तक्रार आलेली आहे. पत्नीने पतीविरोधात तक्रार केलेली आहे. तसेच, त्यावेळी रोहिणी खडसे यांनी मला धमकी दिली, असं पत्नी म्हणाल्या आहेत.

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच, महिला आयोगाकडून पोलिसांना काही महत्त्वाचे निर्देशही दिले आहेत. मात्र, याप्रकरणात रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्यावर टीका होत असून महिला आयोगाने वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, असे नेटीझन्स म्हणत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर जबर शब्दात टीका केली आहे. त्या टीकेला चाकणकर यांनीही जशात तसे उत्तर दिलंय. आता, पुन्हा एकदा रोहिणी खडसे (Rohini khadse) आणि रुपाली चाकणकर आमने-सामने आल्या आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेतून चाकणकर यांनी रोहणी खडसेंवर पलटवार केला.
महिला आयोागकडे पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीची तक्रार आलेली आहे. पत्नीने पतीविरोधात तक्रार केलेली आहे. तसेच, त्यावेळी रोहिणी खडसे यांनी मला धमकी दिली, असं पत्नी म्हणाल्या आहेत. त्यामुळे अशी विकृती आहे, तेंव्हा दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी असं बोलू नये, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर पलटवार केला आहे. तर, दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ शेअर करत रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केलीय. यांची चिड चिड काही थांबे ना ! असे म्हणत रोहिणी खडसेंनी व्हिडिओ शेअर केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा वैष्णवी यांच्या घरी गेल्या असता सामान्य माणसांनी त्यांना जाब विचारला, तर पुन्हा अध्यक्षांची चिड चिड सुरू झाली. कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले असते तर कदाचित आज चिड चिड करण्याची वेळ आली नसती, असे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कस्पटे कुटुंबांच्या भेटीवेळी जाब विचारला. मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे या व अश्या इतर भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडला आहात हे मान्य करा. अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा असे धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावले.
वकिलांनी हगवणेंची केस घेऊ नये
स्व. वैष्णवी कास्पटे आत्महत्या प्रकरण अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. माझ्या वकील मित्र मैत्रिणींनो, या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका अशी मी एक वकील म्हणून आपल्याला विनंती करेल, असे पत्रच रोहिणी खडसेंनी जारी केलं आहे.
हेही वाचा
हार्ट अटॅकनंतर अपघात, 15 मिनिटे ह्रदय बंद पडूनही युवकाचा जीव वाचला; डॉक्टर म्हणाले, जणू चमत्कारच...























