एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane death : दाल में कुछ काला है! भुजबळांच्या स्वागतासाठी बाई सर्वात पुढे; पण वैष्णवीच्या केसवर बोलणं टाळलं, हगवणे प्रकरणावरील चाकणकरांच्या प्रतिक्रियेवर रोहिणी खडसे संतापल्या

Vaishnavi Hagawane death : सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे, अशा शब्दात रोहिणी खडसेंनी हल्लाबोल केला आहे.

मुक्ताईनगर:- पुण्यातील माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणावर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी 'पुणे जिल्ह्यात वैष्णवी हगवणे या महिलेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी  माध्यमांद्वारे समोर आली आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत', अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरती आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे 'वराती मागनं घोडं’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे. शिवाय सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे असा आरोप त्यांनी केला.

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावरून आपली ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे. आहे. "आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागनं घोडं ! बरं बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत ! पुढे त्या म्हणाल्या की, काल परवा मा. छगन भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की दाल में कुछ काला है ! ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेले प्रतिक्रिया आहे का ?"" हा प्रश्न आमच्या मनात आहे", असंही त्या म्हणाल्या. 

वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती. पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघ ही या प्रकरणात गप्प आहेत असंही रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. शेवटी त्या म्हणाल्या की, या अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे असा आरोप त्यांनी केला. या अर्थ असा की सत्तेतील सर्वच लोक 'आपला' म्हणून हगवणेला वाचवत आहे. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे, असंही पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.

वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget