एक्स्प्लोर

Rohit Pawar: तटकरे, मुंडे भाजपसोबत जातील, अजित पवार एकटेच राहतील : रोहित पवार

Rohit Pawar: शरद पवारांवर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये.  मला बच्चा म्हणाले मात्र आता मी मोठा झालोय हे त्यांना कळालं असेल, असे रोहित पवार म्हणाले.

बारामती : बारामतीत (Baramati Lok Sabha Election) नंणद सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवारला (Sunetra Pawar)  जोरदार धक्का दिला आहे.   बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत  जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का  मानला जात आहे.  लोकसभा निकालानंतर आता  अजित पवार एकटेच राहतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलत होते. 

रोहित पवार म्हणाले, लोकसभा निकालानंतर आता अजित पवार एकटेच राहतील. बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील तर सुनील तटकरे धनंजय मुंडे हे तुम्हाला भाजपमध्ये जाताना दिसतील.

शरद पवारांनी त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये : रोहित पवार

अजित पवारांनी घरवापसी केली तर तुम्ही काय निर्णय घेणार याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले,  जर ते येणार असतील तर मी पक्ष सोडेल असं मी म्हणालो नाही.  पण माझी वेगळी भूमिका असेल हे मात्र मी म्हणालो आहे. त्यामुळे शरद पवारांवर ज्यांनी टीका केली त्यांना घेऊ नये.  मला बच्चा म्हणाले मात्र आता मी मोठा झालोय हे त्यांना कळालं असेल. 

अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, आम्हाला नेता बनण्याची घाई झाली नाही. भाजपने खाली राजकारण नेलं होतं. ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे.  जेव्हा अनेक नेते धमक्या देत होतें त्यावेळी आम्ही म्हणत होतो की जनता हे सर्व काही बघत आहे. अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरच राज्य करायचे आहे. वंचित आमच्यासोबत आले असते तर नक्की आणखी वेगळं चित्रं पाहिला मिळालं असतं. 

सुप्रिया सुळे विजयी

महाराष्ट्रातील सर्वात  प्रतिष्ठेची लढाई  ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या  पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरल्या आहेत.  सुप्रिया सुळेंनी  16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे. 

हे ही वाचा :

Baramati Lok Sabha Constituency Election Result 2024 Live : शरद पवारांनी स्वाभिमानाची तुतारी फुंकली, बारामतीत सु्प्रिया सुळेंचा दणदणीत विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Vidhansabha Election : तिढा असलेल्या जागांवर काँग्रेस - ठाकरे गटाच्या बैठकीनंतर शिक्कामोर्तबSanjay Raut PC | मविआच्या जागावाटपाबाबत मोठं विधान, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणThackeray Group :दोन ते तीन दिवसांत ठाकरे गटाची पहिली यादी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
रश्मी बर्वेंना 'सर्वोच्च' दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र रद्द करणं बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
Maharashtra Assembly Elections 2024 : अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
अनिल पाटलांचं टेन्शन वाढलं, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून बड्या नेत्याने ठोकला शड्डू!
Mumbai Local Titwala : चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
चाकरमान्यांनो लक्ष द्या... मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरानं, टिटवाळा अपघाताचा परिणाम मुंबई लोकलवर कायम
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
Embed widget