Rohit Pawar : गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांनी उभे केलेले चॉकलेट बॉय; राजेंद्र राऊतांवरही बोलले रोहित पवार
Rohit Pawar : गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत, देवेंद्र फडणवीसांनी त्यांना उभं केलं, अशी टीका रोहित पवारांनी केली.
Rohit Pawar on Gopichand Padalkar, बारामती : "शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय", अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पडळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार काय काय म्हणाले ?
रोहित पवार म्हणाले, पडळकरांनी काय वक्तव्य केलं माहित नाही, पण त्यांच्या डोक्यात भेसळ झाली आहे. समाजकारण न करणाऱ्या नेत्यांवर काही बोलायचं नाही. पडळकर चॉकलेट बॉय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नेते उभे केले आहेत त्यामध्ये राणे, पडळकर, खोत आणि बार्शीचे राजेंद्र राऊत आहेत. देवेंद्र फडणवीस हे चांगल्या बॉक्समध्ये असतात. देवेंद्र फडणवीस बाकी लोकांना राजकीय उद्देशाने भुंकायला लावतात. यांच्यावर पोलीस ठाण्यात काय काय केसेस आहे ते बघा, असंही पवार म्हणाले.
गायकवाड गुंडगिरी, तलवारीने केक कापतात
गायकवाड आमदार आहेत, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. गुंडगिरी, तलवारीने केक कापतात. गायकवाड पवित्र भूमीतून येतात गायकवाड यांना लोकं लोकशाहीतून कापून काढतील. भाजप घाबरली आहे, त्यामुळे दोन टप्प्यात निवडणूक घेतील. अजून घाबरले तर तीन टप्प्यात घेतील. मोदी साहेब येणार इथे सभा घेतील. मोदींनी जिथे सभा घेतली तिथं त्यांचे उमेदवार पडले आहेत. दसरा झाला की निवडणूक लागेल असे वाटतंय.
पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ म्हणाले, त्यावर किती कॅबिनेट झाल्या?
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 16 नोव्हेंबरच्या आत निवडणूक होईल असं वाटतंय. 2014 ला धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस खोटे बोलले होते. पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ,त्यावर किती कॅबिनेट झाल्या? निवडणूक झाल्या की तुम्हाला आठवत की अशी समिती करू तशी समिती करू. निवडणूक आली की तुम्ही लोकांना तिथं बसवता.
मनोज जरांगे हे सामाजिक काम करतात. सत्तेत असणारी लोक प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय दृष्टीतून प्रत्येकाला बघतात. राजकीय नेत्यांनी समजून घेतले पाहिजे की सगळंच राजकीय हेतूने होतं नसतं काही गोष्टी सामाजिक गोष्टी पण असतात. आगामी काळात कर्जत जामखेडचे वजन आणखी वाढलेलं तुम्हाला दिसेल. पवार साहेब गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्र्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री सभा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बिझी असावेत. जी परीक्षा पुढे ढकलली ती परीक्षा कधी होणार आहे हे माहित नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या