(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raosaheb Danve : ''गुन्हेगार नसाल तर ED ला घाबरायचं कारण काय?" दानवेंचा राऊतांना सवाल
ईडीची (ED) कारवाई आताच होते आहे का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचं काय कारण आहे? असा सवाल रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) संजय राऊत यांना केला आहे.
Raosaheb Danve : आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर (ED) खळबळजनक आरोप केले. त्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंनी (Ravsaheb Danve) टीका केली आहे. ईडीची (ED) कारवाई आताच होते आहे का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचं काय कारण आहे? असा सवाल रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) संजय राऊत यांना केला आहे.
कलमाडी जेलमध्ये गेले तेव्हा कुणाचं सरकार होतं? - दानवे
लालूप्रसाद जेलमध्ये गेले, अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाली, कलमाडी जेलमध्ये गेले तेव्हा कुणाचं सरकार होतं? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. दरम्यान राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर खळबळजनक आरोप केले. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचा अपमान तर महाविकास आघाडीने केला - दानवे
महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान तर या तीन पक्षांनी केला (Mahavikas aghadi) असं सांगत महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंनी (Railway Minister Raosaheb Danve) निशाणा साधला आहे. भाजपला राज्यातल्या जनतेने जनादेश दिला होता. त्यांनाच विरोधी बाकावर बसवलं. जनतेच्या जनादेशाविरोधात जेव्हा तुम्ही वागता तेव्हा अपमान होतो. असेही दानवे यावेळी म्हणाले. 2024 मध्ये स्वबळावर निवडणुका लढवू आणि सरकार आणू. आमच्या सोबत होतात म्हणून तुम्ही इथे पोहोचलात. लोकसभा आणि विधानसभेत तुम्ही आमच्या सोबत नसता तर काय हालत झाली असती. दानवेंनी शिवसेनेला टोला लगावला
यंदा रेल्वेसाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद
2022-23 बजेट सर्वसामान्य साठी तयार झालं आहे. यंदा 11 हजार कोटी रुपयांची तरतूद रेल्वेसाठी केली आहे. जालना-जळगाव नवा रेल्वे मार्ग तयार करणार असून सुरत-अहमदाबाद मार्गासाठी मदत होणार, मराठवाड्याला महत्त्वाचा लोहमार्ग असणार. सर्व्हेसाठी 4.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 174 किलोमीटर चा हा नवा रेल्वेमार्ग असल्याची माहिती दानवेंनी यावेळेस दिली
काय म्हणाले होते राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, हे पत्र माहितीसाठी ट्रेलर अजून बाकी आहे, असं राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले...
PM Modi in Rajyasabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतही विरोधकांवर निशाणा, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha