Ramraje Naik Nimbalkar : सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच, रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा, फलटण साताऱ्यात राजकीय संघर्ष वाढणार?
Ramraje Naik Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवात तुम्ही केली आहे तर शेवट मी करणारचं. असं व्हाट्सअप स्टेटस ठेवलं आहे.

सातारा/ मुंबई : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाटसअपला एक स्टेटस ठेवलं आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सुरु असलेली आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर हे स्टेटस त्यांनी ठेवलंय. त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी "सुरुवात तुम्ही केली आहे तर शेवट मी करणारच." असं म्हटलं आहे. यानिमित्तानं रामराजे नाईक निंबाळकर यांचा अप्रत्यक्षरित्या मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांना इशारा दिलाय का असा सवाल उपस्थित आहे.
रामराजेंचं स्टेटस, नव्या राजकीय संघर्षाचे संकेत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील वचपा काढण्यासाठी भाजप मधील या दोन नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा निंबाळकर कुटुंबियांच्या पाठीमागे लावल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर कुटुंबियांची केवळ इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आली. बुधवारपासून सुरु असलेली कारवाई रविवारी रात्री संपली. यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्टेटस ठेवलेलं चर्चेचा विषय आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेट्स नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाची कारवाई काल संपली आणि आज त्यांनी स्टेटस ठेवलं आहे.
भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष सातारा जिल्ह्यात वेळोवेळी पाहायला मिळाला आहे. रामराजेंच्या स्टेटसनंतर हा संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार का अशा चर्चा आहेत. सध्या तरी रामराजेंनी स्टेटस ठेवत कुणाचं नाव घेतलेलं नाही. यामधून कार्यकर्त्यांना देखील संदेश देण्याचा प्रयत्न असू शकतो.
कार्यकर्त्यांनाही संदेश
रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक गेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेर आयकर विभागाची जी कामगिरी सुरु होती, त्यावेळी घराबाहेर थांबलेले होते. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सुरू असलेली कारवाई काल पाचव्या दिवशी संपली. बुधवारी सुरू झालेली कारवाई काल संपली त्यानंतर समर्थकांना दिलासा मिळाला. आयकर विभागाचे अधिकारी निघून जाताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉटसअप स्टेटसला जरी सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारचं असं स्टेटस ठेवलंय. या स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांशी संघर्षाला तयार असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न रामराजे नाईक निंबाळकर यांचा आहे का हे देखील पाहावं लागेल.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

